शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंची 'ऑडी' जप्त, पोलीस कोठडी आज संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 07:22 IST

आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या ताफ्यातील ५० लाख रुपयांची आॅडी ही कार जप्त केली. यापूर्वी त्यांच्या ६ आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या़

पुणे : आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या ताफ्यातील ५० लाख रुपयांची आॅडी ही कार जप्त केली. यापूर्वी त्यांच्या ६ आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या़डी़ एस़ कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे बुधवारीही पोलिसांची चौकशी सुरू होती़ आता आपली यातून सुटका नसल्याची जाणीव झाल्याने त्यांच्याकडून पोलिसांना सहकार्य मिळू लागले आहे़ पोलीस डीएसके यांना बुधवारी त्यांच्या कार्यालयात घेऊन जाऊन दिवसभर कागदपत्रांची तपासणी करीत होते़ तपासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत़डीएसके व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना न्यायालयाने गेल्या शुक्रवारी १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती़ यापूर्वी उच्च न्यायालयाने पोलिसांकडे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते़ त्या वेळी त्यांच्याकडून तपासासाठी पोलिसांना सहकार्य मिळाले नव्हते़ गेल्या सात दिवसांत पोलिसांना त्यांनी तपासात सहकार्य करण्यास सुरुवात केली असली, तरी अजूनही ठेवीदार व फ्लॅटधारकांचा पैसा कोठे वळविला, याची पुरेशी माहिती त्यांच्याकडून पोलिसांना मिळालेली नाही़ आता मात्र ते सहकार्य करू लागले आहेत़ डीएसके यांच्याविरुद्ध कोल्हापूर आणि मुंबईतही गुन्हे दाखल झाले आहेत़पोलीस कोठडी संपणारसात दिवसांत डीएसके यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना दररोज वैद्यकीय तपासणीसाठी नेणे, आणणे यात तपासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही़ या गुन्ह्याचा आवाका मोठा असल्याने ही पोलीस कोठडी पुरेशी नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़ त्यामुळे गुरुवारी न्यायालयात पोलिसांकडून पोलीस कोठडी वाढून मिळावी, यासाठी विनंती केली जाण्याची शक्यता आहे़

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी