शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

डीएसके दाम्पत्याची ५ तास चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:03 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती हे बुधवारी सकाळी पुणे पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. त्यांची पोलीस अधिका-यांनी ५ तास चौकशी केली.

पुणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती हे बुधवारी सकाळी पुणे पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले़ त्यांची पोलीस अधिका-यांनी ५ तास चौकशी केली़आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, तपास अधिकारी व सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी त्यांची सकाळी २ तास तर दुपारनंतर सलग ३ तास चौकशी केली़ त्यांनी ठेवीदारांकडून घेतलेल्या ठेवींची कोठे कोठे गुंतवणूक केली़ त्यांच्या मालमत्ता आणखी कोठे आहेत, याविषयी चौकशी केली़ ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरुवातीला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या पुणे, मुंबई येथील कार्यालयासह घरावर छापे टाकून सर्व कागदपत्रे जप्त केली होती़ बँकांची खातीही सील करण्यात आली़ त्यातून जी माहिती पोलिसांना उपलब्ध झाली़ त्याबाबत प्रश्न विचारण्यात आले़ चौकशीनंतर बाहेर आल्यावर डी़ एस़ कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला़ पोलिसांनी परवानगी दिली तरच आपण बोलू, असे त्यांनी सांगितले़ चौकशीबाबत मोरे यांनी सांगितले, की या चौकशीचा अहवाल आम्ही न्यायालयात सादर करणार आहोत. तपास सुरू असल्याने नेमके काय विचारण्यात आले, हे सांगता येणार नाही़ डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ४ हजार २० ठेवीदारांनी तक्रारी केल्या आहेत. ठेवींची रक्कम २८० कोटी ५८ लाख ५६ हजार ५८८ रुपये इतकी आहे़ त्यांच्या मालमत्तांची यादी एका महिन्यापूर्वीच जिल्हाधिकाºयांना दिली असून त्यावर महसूल विभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे, असे त्यांनी सांगितले़उच्च न्यायालयात ५० कोटी रुपये जमा करण्यात डी. एस. कुलकर्णी यांना अपयश आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही पोलीस चौकशी सुरू झाली आहे़ही चौकशी दररोज सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ५ या दरम्यान आणखी ४ दिवस सुरु राहणार आहे़ प्रामुख्याने त्यांनी ठेवीदारांचा आलेला पैसा हा अन्यत्र कोठे गुंतविला़ बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्जाच्या रकमेचा विनियोग कोठे केला, याची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत़डीएसके यांच्या आर्थिक व्यवहाराचे फॉरेन्सिक आॅडिट करण्यासाठी पोलिसांनी लेखा परिक्षकाची नेमणूक केली असून त्यांचा अहवाल महिन्याभरात येण्याची शक्यता आहे़ त्यातून डीएसके यांनी हा सर्व पैसा नेमका कोठे वळविला, ते उघड होण्याची शक्यता आहे़डी़ एस़ कुलकर्णी यांच्या घोटाळ्याची सेबीने दखल घेतली असून त्यांच्याकडूनही चौकशी सुरू करण्यात आली आहे़ त्यासाठी गंभीर फसवणुकीच्या तपासासाठी अधिकाºयाची (एसएफआयओ) नेमणूक करण्यात आली़

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीCourtन्यायालय