शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’मुळे टंचाईग्रस्त २२ गावे पाणीदार!

By admin | Updated: March 31, 2016 02:58 IST

गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून २०० गावांत कामे झाल्याने सध्याच्या तीव्र पाणीटंचाईच्या काळातही २२ गावांतील टँकर हटले आहेत.

- बापू बैलकर,  पुणेगेल्या दीड वर्षात जिल्ह्यात शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून २०० गावांत कामे झाल्याने सध्याच्या तीव्र पाणीटंचाईच्या काळातही २२ गावांतील टँकर हटले आहेत. एकीकडे जिल्ह्यात पाणीटंचाईने परिस्थिती गंभीर होत असताना ही गावे मात्र आजही पाणीदार आहेत. या योजनेतून पहिल्या टप्प्यात भोर १२, वेल्हे ११, मुळशी १३, मावळ १५, हवेली १८, खेड १५, आंबेगाव ११, शिरूर १६, जुन्नर १५, बारामती १६, पुरंदर २२, दौैंड २१ व इंदापूर १५ अशा २०० गावांची निवड झाली होती. या गावांत कम्पार्टमेंट बीडिंग, सलग समतल चर, माती नालाबांध, अनगड दगडी बांध, गॅबियन स्ट्रक्चर, खोल सलग समतल चर, अर्बन स्ट्रक्चर, माती नाला बांधदुरुस्ती, शेततळे, साखळी सिमेंट बंधारा, सिमेंट बंधारा दुरुस्ती, नाला गोलीकरण व रुंदीकरण, पाझर तलाव व दुरुस्ती, के.टी. वेअर व दुरुस्ती, कालवा दुरुस्त, सिंचन विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पुनर्भरण चर, रिचार्ज शाफ्ट, गाळ काढणे,मजगी, वनतळे, वळण बंधारा अशी ४ हजार ४३३ कामे हाती घेतली होती. यातील ३ हजार ३३८ कामे पूर्ण झाली असून ७५३ कामे प्रगतिपथावर आहेत. यासाठी ९,८६४.५३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही बहुतांश कामे लोकसहभाग व शासकीय मदत यांतून करण्यात आली. यातील बहुतेक सारी कामे पावसाळ्यापूर्वीच झाल्याने पावसाळ्यात या कामांत ३०,०७२.२५ दलघमी पाणीसाठा होऊन २८,८४३.५ हेक्टर एवढे क्षेत्र सिंचनाखाली आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. या वर्षी कमी पाऊस झाल्याने आजच्या परिस्थितीत जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. सुमारे पावणेदोन लाख लोकांना ७३ टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, टंचाईतून मुक्तता मिळावी यासाठीच हाती घेतलेल्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेचा नेमका किती फायदा होत आहे, याचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील सुमारे २२ ते २५ गावांतील टंचाई ‘जलयुक्त’मुळे संपली आहे. आजच्या तारखेला ही गावे पाणीदार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी सांगितले. अन्यथा, या परिस्थितीत या गावांत सुमारे ३० ते ४० टँकरने पाणीपुरवठा करावा लागला असता. सद्य:स्थितीत मात्र तेथे टँकर सुरू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यात भोर तालुक्यातील भोंगवली, वेल्हे तालुक्यातील रांजणे, खेडमधील वाफगाव, जउळके, चिंचबाईवाडी, कनेरसर, भागडी, आंबेगावमधील लोणी-धामणी, पहाडदरा, जुन्नरमधील संतवाडी, शिरूरमधील धामारी, जांबूत, पुरंदरमधील वाल्हे, पिंगारी, पानवडी, धानोरी, गुळुंचे, बारामतीतील जोगवडी, मुर्टी, भोंगडेवाडी, पारवडी व इंदापूरमधील कळस या पूर्वीच्या टंचाईग्रस्त गावांचा समावेश आहे. लोणीधामणी : साडेचारशे हेक्टरवर कांदाजिल्ह्यात दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेले आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी गावाची जलयुक्तमधून झालेल्या कामामुळे ही ओळख पुसली गेली आहे. २0१२ पर्र्यत टंचाईत १३ वाड्या वस्त्यांवर ७ ते ९ टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. गावाने एकत्र येवून या टंचाईतून मुक्त होण्याचे ठरविले आणि जलयुक्त शिवार या योजनेत लोकसहभाग दाखवला. त्यामुळे १७ सिमेंट बंधार, ओढा खोलीकरण, दोनशे हेक्टरपर्र्यत समतल चर, २२ माती नाल्यांचे गाळ काढल्याने ही पहिली वेळ आहे की गावात साडेचारशे हेक्टरवर सध्या कांदा लागवड केली आहे. या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असायची. यावर्षी गावात विहीरींना आजही चांगला पाणीसाठा असून गाव टँकरमुक्त झाले असल्याचे माजी सरपंच अंकूश भुमकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जलयुक्त शिवार योजना लोकसहभागातून सुरू आहे. ज्या गावांतील लोकांनी यासाठी पुढाकार घेतला, तेथे मोठ्या प्रमाणात व चांगली कामे झाली आहेत. त्यामुळे सध्याच्या टंचाईतही या गावांना पाणीटंचाईची झळ बसली नाही. - सुभाष काटकर, अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी