शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

दुष्काळातही शेततळी वरदान

By admin | Updated: August 6, 2015 03:38 IST

सध्याच्या दुष्काळसदृश स्थितीत फळबागांना जगविणारी, आठमाही पाणी परवानाधारकांना बागायतदाराचा दर्जा देणारी, वैयक्तिक व सामुदायिक शेततळी म्हणजे

शैलेश काटे, इंदापूर सध्याच्या दुष्काळसदृश स्थितीत फळबागांना जगविणारी, आठमाही पाणी परवानाधारकांना बागायतदाराचा दर्जा देणारी, वैयक्तिक व सामुदायिक शेततळी म्हणजे शेतकऱ्यांच्या भरवशाच्या पाण्याच्या बँका ठरलेल्या आहेत. त्यामुळे दुष्काळात शेततळी वरदानच ठरली आहेत.सन २००३-०४ च्या सुमारास ही शेततळ्यांची योजना सुरू झाली. पुढच्या दोन-तीन वर्षांत तिने गती घेतली. प्रथमत: पुरेशा गांभीर्याने न घेतलेल्या या योजनेचे महत्त्व त्या दशकात सतत दुष्काळ अनुभवणाऱ्या इंदापूरकरांना चांगलेच पटले. आजघडीला सन २०१२-१३, सन २०१३-१४ या कालावधीत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून १९४ सामुदायिक शेततळी झाली आहेत. ४ कोटी ९० लाख १ हजार ७४ रुपयांचे अनुदान मिळाले आहे. ८ लाख ३१ हजार ५०० घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सन २०१३-१४ या वर्षात १३६ लाभार्थ्यांना २ कोटी ६९ लाख ७७ हजार ७७४ रुपये अनुदान मिळाले. निर्माण झालेल्या शेततळ्यांमध्ये ४ लाख ५५ हजार घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.पावसाचा लहरीपणा, भूगर्भातील पाणीपातळीत होणारी घट, वातावरणातील बदलांमुळे तापमानात होणारी वाढ, वीज भारनियमनाचे संकट यातून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्च ते जूनदरम्यान पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असे. भीमा, नीरा नद्यांच्या किनारी शेतकऱ्यांनी उचलपाणी परवानगी घेऊन अथवा विनापरवाना उपसा सिंचन योजना राबवल्या. त्यामुळे त्यांना उन्हाळा तितकासा जाचत नसे. नीरा कालव्यावरील बारमाही पाणी परवानाधारकांनाही उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत नसे. मात्र, तालुक्यातील निमगाव केतकी पट्टयातील २२ गावे, खडकवासला कालव्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहावे लागत असे.आठमाही पाणी परवानाधारकांना मार्च ते जून या कालावधीत शेतीला शाश्वत पाण्याची सोय करण्यासाठी शेततळ्याच्या योजनेचा पर्याय पुढे आला. दुष्काळात त्याची उपयुक्तता जाणवली. शेततळ्याची सुरुवात तालुक्यातील बोरी गावापासून झाली. तेथील द्राक्ष व डाळिंबाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डाळिंब व द्राक्षासारख्या पिकांना गरजेप्रमाणे पाणी व्यवस्थापन करणे शेततळ्यांमुळे सोयीस्कर होऊ लागले. बघता बघता शेततळे घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली.चालू वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे जून महिन्यामध्ये फळझाडांची पाण्याची गरज शेततळ्यांनीच भागवली आहे. इंदापूर तालुक्यातील फळबागा मध्यम ते हलक्या प्रतीच्या जमिनीवर बहरलेल्या आहेत. ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी फळबागांचे व्यवस्थापन करीत आहेत. शेततळ्यातील पाण्याचा गरजेएवढाच वापर करण्यात येत असल्याने द्राक्ष व डाळिंब बागा योग्य प्रकारे जोपासल्या गेल्या आहेत. काळ्या रंगाच्या द्राक्षाच्या निर्यातीमध्ये इंदापूर तालुका अग्रेसर राहील. त्यामध्ये शेततळ्याचे मोठे योगदान आहे.