शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीचे ठेकेदारांकडील चालक संपावर

By admin | Updated: June 30, 2017 04:10 IST

पुणे महानगर परिवहन (पीएमपी) मंडळाला भाडेतत्त्वावर बस पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांच्या चालकांनी गुरुवारी अचानक संप पुकारला.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे महानगर परिवहन (पीएमपी) मंडळाला भाडेतत्त्वावर बस पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांच्या चालकांनी गुरुवारी अचानक संप पुकारला. पीएमपीकडून कंपनीला होणारा दंड चालकांकडून वसूल करण्याच्या कंपनीच्या धोरणाविरोधात हा संप पुकारण्यात आला. पीएमपीला कसलीही पूर्वसूचना न देता पुकारण्यात आलेल्या या संपामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. प्रवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागला.पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ६५३ बस खासगी कंपन्यांकडून घेतलेल्या आहेत. एकूण ५ ठेकेदारांनी या बस पुरवल्या आहेत. या बस थांब्यावर थांबत नसतील, तर त्यांना दंड करण्याचा निर्णय व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. त्यासाठी त्यांनी बसवर जीपीएस यंत्रणा बसवली आहे. त्यातून त्यांना थांब्यावर कोणती बस थांबली नाही, हे लक्षात येते. या पद्धतीमुळे गेल्या काही महिन्यांत कंपन्यांना फार मोठ्या प्रमाणावर दंड झाला आहे. मात्र, त्याचमुळे बस थांब्यावरच थांबण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.हा दंड चालकांकडून वसूल करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला. चालक बस थांब्यावर थांबवत नाहीत; त्यामुळे दंडाची जबाबदारी त्यांचीच आहे, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे जीपीएस यंत्रणेत त्रुटी असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. मात्र, चालक म्हणून मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत दंड करणे म्हणजे आर्थिक पिळवणूक आहे, असे चालकांचे म्हणणे आहे. ते त्यांनी ठेकेदारांकडे मांडण्याऐवजी थेट संपच पुकारला. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील सार्वजनिक वाहतूकव्यवस्था विस्कळीत झाली. दुपारी ३ वाजता संप सुरू झाला.संपाची माहिती मिळताच मुंढे यांनी तत्काळ पर्यायी व्यवस्था सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. सायंकाळी गर्दीच्या वेळेस ते स्वत: पुणे स्टेशन व अन्य काही गर्दीच्या मार्गांवर फिरत होते. गेल्या काही महिन्यांत पीएमपीच्या मालकीच्या जादा बस रस्त्यावर आल्या आहेत. त्याचाही त्यांना फायदा झाला. १ हजारापेक्षा जास्त बस संपानंतरही मार्गांवर होत्या. ठेकेदारांच्या बस बीआरटी मार्गांवरून धावणाऱ्या आहेत. मुंढे यांनी पीएमपीच्या मालकीच्या बस बीआरटीच्या बाहेरून सुरू केल्या. त्यामुळे प्रवाशांची अडचण कमी होण्यास मदत झाली.चालकांनी बस बंद ठेवल्या यासंबंधी ट्रॅव्हलटाइम कार रेंटल कंपनीचे मंदार हिंगे यांनी सांगितले, की जीपीएस यंत्रणा बरोबरच आहे, असे समजून प्रशासन दंड करीत आहे. हा दंड अवाजवी आहे. तो जमा करणे कंपनीलाही परवडणारे नाही. त्यामुळे चालकांकडून काही प्रमाणात दंड आकारण्याबाबत विचार सुरू होता. तसे होण्याच्या भीतीने चालकांनी बस बंद ठेवल्या. प्रशासनाने या यंत्रणेचा विचार केला पाहिजे.