शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेत आता ड्रेसकोड; शोभेल असाच पेहराव करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 21:29 IST

Pune Municipal corporation : शासकीय कर्मचाऱ्याला शोभेल असाच पेहराव करण्याचे आदेश. राज्य शासनाच्या निर्णयावर वाद झालेला असतानाच महापालिकेचं पाउल. कर्मचाऱ्यांच्या हिरोगिरीला चाप

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम असलेल्या कपडे न घालता, आपण पुणे महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून नागरिकांना सामोरे जात आहोत याचे भान सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेवावे. असे खडे बोल सुनावणीत महापालिका प्रशासनाने, महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या 'हिरोगीरीला ' चाप लावला आहे. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या सेवकांना 'जीन्स पॅन्ट व टी शर्ट ' घालता येणार नाही. तर महिला कर्मचाऱ्यांनाही साडी, सलवार- कुर्ता  परिधान करूनच कामावर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, याची अंमलबजावणी होते की नाही याची जबाबदारी प्रत्येक खाते प्रमुख, विभाग प्रमुख व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

 पुणे महापालिकेत दररोज लोकप्रतिनिधी, विविध संस्थाचे प्रतिनिधी, उच्च पदस्थ अधिकारी व सर्व सामान्य नागरिक येत असतात. अशावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी हे महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून संवाद साधतात. अशावेळी त्यांची वेशभूषा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून पहिला जातो. तर संबंधिताच्या वेशभूषेवरून ते कार्यरत असलेल्या आस्थापनेची छाप भेट देणाऱ्या व्यक्तीवर पडत असते. यामुळे महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या व्यक्तीला सामोरे जाताना, आपली वेशभूषा किमान शासकीय कामास शोभेल अशी असेल याची सर्वांनी काळजी घ्यावी. असे या आदेशात नमूद केले आहे.पुरुष सेवकांसाठी वेशभूषा ( ड्रेस कोड)आवश्यक :- शर्ट पॅन्ट / ट्राऊझर पॅन्ट : बूट, सॅंडलमनाई :- जीन्स - टी शर्ट, स्लीपरमहिला सेवकांसाठी ( ड्रेस कोड)आवश्यक : साडी, सलवार- कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्टमनाई : अन्य फॅशनेबल पेहराव, चित्रविचित्र नक्षीकाम व चित्रे असलेले ड्रेस, स्लीपरआठवड्यातून एकदा खादी वापरा !         खादीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी किमान एक दिवस तरी खादी कपड्याचा पेहराव करावा ( गणवेश नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त) असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.ओळखपत्र अनिवार्यकार्यालयीन वेळेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दर्शनी भागावर धारण करणे यापुढे अनिवार्य करण्यात आले आहे.पेहराव नीटनेटका व स्वच्छ असावा   महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना पेहरावाबाबत सूचना देतानाच, हा पेहराव नीटनेटका व स्वच्छच असावा असेही नमूद करण्यात आले आहे.       तसेच सदर ड्रेस कोड हे महापालिकेच्या नियमित सेवकांसह, कंत्राटी कामगार, व्यवसायीक सल्लागार यांनाही कार्यालयीन वेळेत लागू राहणार आहे. याची अंमलबजावणी होते की नाही याची खबरदारी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका