शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न २८ वर्षांनी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 02:21 IST

सोशल मीडियावरही कालपासून आभाराच्या पोस्ट झळकू लागल्या आहेत.

शिरूर : २८ वर्षांनी घरे नावावर झाल्याने येथील हुडकोवासीयांनी यासाठी झटणाऱ्या सर्वांचे आभार मानले. सोशल मीडियावरही कालपासून आभाराच्या पोस्ट झळकू लागल्या आहेत.१९९२मध्ये हुडकोवासीयांना घरे ताब्यात मिळाली. या घरांसाठी प्रतिमाह साडेतीनशे रुपयांचा हप्ता होता. २००४ मध्ये हप्ते पूर्ण झाले. त्यानंतरही घरे नावावर होण्यास १४ वर्षे वाट पाहावी लागली. या वसाहतीतील १२७ लोकांनी सुरुवातीच्या काळात दुसऱ्यांना घरे विकली होती. यांपैकी अनेक घरांचे तीन ते पाच घरमालक बदलले. घरांची विक्री झाली; मात्र ती ना मूळ लाभार्थ्याच्या नावावर होती, ना नव्याने विकत घेतलेल्या लाभार्थ्याच्या. २८ वर्षे सर्व जण घरे नावावर होण्याच्या प्रतीक्षेत होते. हुडको वसाहतीसाठीच्या जागेचे ५८ लाख रुपयांचे मूल्य २०१४मध्ये शासनाकडे जमा करूनही हुडकोवासीयांची प्रतीक्षा संपली नव्हती. नगर परिषदेने आवश्यक ती सर्व यंत्रणा राबवून पाठपुरावा सुरू ठेवला होता.घरे लवकरात लवकर नावावार व्हावीत, यासाठी हुडकोतील नागरिकांनी हुडको संघर्ष कृती समितीची स्थापना केली होती. या समितीने आंदोलनही केले होते. एक एप्रिल रोजी आमदार बाबूराव पाचर्णे, सभागृह नेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत हुडकोवासीयांसमवेत बैठक पार पडली. या वेळी शासनस्तरावर हुडकोच्या प्रकरणाच्या स्थितीबाबत व तांत्रिक अडचणीबाबत आमदार पाचर्णे यांनी सविस्तर माहिती देऊन लवकरात लवकर घरे नावावर करण्याचे आश्वासन दिले होते. धारिवाल यांनीही सर्वांना याबाबत आश्वस्त केले होते.यानंतरच्या काळात नगर परिषदेने आमदार पाचर्णे यांच्याशी समन्वय ठेवून पाठपुरावा सुरू ठेवला. जून (२०१८) महिन्यात पुणे येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या गृहनिर्माण, महसूल, नगर नियोजन विभागाच्या एकत्रित संयुक्त बैठकीत जिल्हाधिकाºयांनी हुडकोचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. यानंतर आमदार पाचर्णे यांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांना आश्वासनाबाबत आठवणही करून दिली.मागील आठवड्यात त्यांनी याबाबत पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्याधिकारी अ‍ॅलिस पोरे यांनीही मंत्रालय प्रशासन स्तरावर चांगले प्रयत्न केले. अशोक पवार आमदार असताना त्यांचेही यााकामी सहकार्य लाभले आणि अखेर ८ मार्चला हुडकोवासीयांच्या नावावर घरे करण्याचा अध्यादेश पारित झाला. घरे नावावर झाल्याने यासाठी झटलेल्या आमदार पाचर्णे, सभागृह नेते धारिवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, नगरसेविका उज्ज्वला वारे, रोहिणी बनकर, संदीप गायकवाड, माजी नगराध्यक्षा अलका सरोदे, रवींद्र ढोबळे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, अशोक पवार यांचे आभार मानले.हुडकोवासीयांना अवघ्या ३० हजार रुपयांत घरे मिळाली. यामुळे सर्वसामान्यांचे स्वत:चे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकले. तत्कालीन नगराध्यक्ष शहीदखान पठाण, रसिकलाल धारिवाल यांचेही वसाहत उभी राहण्यात मोठे योगदान होते.ं