शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गोल्ड कोस्टमध्ये गोल्ड जिंकण्याचे स्वप्न पूर्ण :  मनिका बत्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 20:03 IST

जागतिक स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांना जर पराभूत करायचे असले तर तंत्रासह तंदूरूस्तीसुध्दा महत्वाची : मनिका बत्रा

ठळक मुद्देआगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी उत्सुक, सराव योग्य दिशेने आंतरराष्ट्रीय प्रकाराच्या अ‍ॅकॅडमी भारतात सर्व ठिकाणी असायला हव्या

शिवाजी गोरे  पुणे : गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कुलसारख्या मोठ्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न मी स्पर्धेला जाण्यापूर्वी पाहिले होते आणि त्या स्पर्धेत दोन सुवर्ण (महिला एकेरी व सांघिक), एक रौप्य (महिला दुहेरी) व एक कांस्यपदक (मिश्र दुहेरी) जिंकून मी ते पूर्णही केले. राष्ट्रकुल स्पर्धेतील माझ्या कामगिरीवर मी समाधानी असल्याचे भारताची अव्वल आाणि जागतिक क्रमवारीत ५८ व्या क्रमांकावर असलेली टेबल टेनिसपटू मनिका बत्राने लोकमतला सांगितले. पुण्यातील इंडिया खेलो या टेबल टेनिस अ‍ॅकॅडमी येथे मनिका तेथील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आली असता मनिका यांनी वरील वक्तव्य केले. मनिका म्हणाली, राष्ट्रकुल स्पर्धेला जाण्यासाठी पूर्वी गुप्तासरांकडून योग्य मार्गदर्शन झाले होते. महिला एकेरीत जेव्हा मी जागतिक क्रमवारी चौथ्या क्रमांकावर असलेल्या सिंगापूरच्या यूला जेव्हा मी पराभूत केले केले तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर माझ्यासह भारतीय महिलांनी आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून त्या स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये निर्विवाद वर्चस्व राखले. संघातील प्रत्येक खेळाडूने आपले योगदान योग्य प्रकारे दिल्यामुळेच आम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखू शकलो. राष्ट्रकुलमधील इतर देशांच्या अव्वल खेळाडूंविरुद्ध खेळताना आम्ही रणनिती आखून नियोजन करायचो. त्याच्या खेळचे विश्लेषण केले जायचे आणि मग आमच्या खेळाची रणनिती ठरविण्यात येत होती. आगामी स्पर्धांबाबत विचारले असता मनिका म्हणाली, सध्या मी पुण्यात यूटीटी स्पर्धेसाठी तयार आहे. ही स्पर्धासुद्धा मोठी आहे, यामध्ये परदेशी खेळाडूसुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खेळून आपल्यामधील काही चुका असतील तर त्या सुधारण्याची संधी मिळणार आहे. याच बरोबर तंदूरूस्तीवर (फिटनेस) सुध्दा मी जास्त लक्ष देत आहे. कारण टेबल टेनिस हा खेळ जलद आहे आणि जागतिक स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांना जर पराभूत करायचे असले तर तंत्रासह तंदूरूस्तीसुध्दा महत्वाची आहे.  इंडिया खेलो या  खेळाकडून सुरू केलेल्या अ‍ॅकॅडमीबाबत विचारले असता, मनिका म्हणाली, या आंतरराष्ट्रीय प्रकाराच्या अ‍ॅकॅडमी भारतात सर्व ठिकाणी असायला हव्यात, त्यामुळे भारतातून अव्वल दर्जाचे टेबल टेनिस खेळाडू तयार होऊ शकतील. 

टॅग्स :PuneपुणेManika Batraमनिका बत्राSportsक्रीडा