बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या सूचनेवरून त्यांच्या कुटुंबीयातील रोहित राजेंद्र पवार, तर परंपरागत विरोधक म्हणून ओळखले जाणारे काकडे कुटुंबातील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद भगवानराव काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. जिल्हा परिषद, पंचायत समितीला जवळपास सर्वच नव्या चेहऱ्यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपा, रासप, आरपीआय ही निवडणूक एकत्र लढत आहेत. मात्र, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष माणिकराव काळे यांना भाजपाने थेट उमेदवारीच दिल्याने ‘युतीला’ धक्का बसला. आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होती. सुपे-मेडद गटातून भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिलीप खैरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.या निवडणुकीत भाजप, रासप, रिपाई एकत्रित निवडणुका लढत आहेत. मात्र, भाजपने युतीमधील रासपाच्या तालुकाध्यक्ष माणिकराव काळे यांना जिल्हा परिषद गटाची भाजपच्या वतीने उमेदवारी दिली. त्यामुळे रासपच्या पदाधिकाऱ्यांनाच धक्का बसला. याबाबत पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी प्रत्येक गण, गटात पक्षाचा डमी उमेदवारांचे देखील अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश खोमणे, सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष सुनिल भगत यांनी अपक्ष दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची देखील चर्चा आहे. त्यांची बंडखोरी कायम राहणार का, हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल. या निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढत आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्थानिक शेतकरी कृती समिती, विरोधी पक्षांमधील नाराज स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. मनसे, बसपाने देखील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. पंचायत समिती गणाच्या चार जागा रासपला सोडण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद गटांमध्ये शिर्सुफळ-गुणवडी गटात भाजपने गुलाबराव गावडे, संदेश गावडे, सुपा -मेडद गटात दिलीपराव शंकरराव खैरे, सांगवी - डोर्लेवाडी गटात अश्विनी युवराज तावरे, निलम राहुल तावरे, माळेगाव - पणदरे गटात विजया रंजनकुमार तावरे, उषादेवी धैर्यशील तावरे, करंजेपूल-निंबूत गटात इंद्रजित भोसले, हंबीरराव जगताप आणि वडगाव निंबाळकर -मोरगाव गटात माणिकराव काळे, रविंद्र खोमणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, सुपे -मेडद गटातील भाजपचे उमेदवार दिलीपराव खैरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा लक्षवेधी होता. बारामती तालुक्यातील गट, गणातील उमेदवारांची नावे पुढील प्रमाणेशिर्सुफळ-गुणवडी गटगावडे गोरख नानासो - अपक्षपवार रोहित राजेंद्र - राष्ट्रवादी गावडे गुलाबराव बाजीराव - अपक्षकाटे सतिश अशोक - अपक्षखटके निलेश भारत -अपक्षजाधव अजित प्रल्हाद - अपक्षआटोळे प्रविण ज्ञानदेव - भाजपपिंगळे राजेंद्र माणिक - शिवसेनाकाटे अजित रमेश - शिवसेनागावडे संदेश कृष्णराव -भाजपगावडे गुलाबराव बाजीराव - भाजपसुपा मेडद गटखैरे दिलीप शंकर - भाजपवाबळे निलेश शिवाजी - मनसेचांदगुडे संजय उत्तम - काँग्रेसशिंदे रोहित सत्यवान -अपक्षपरकाळे सदाशिव गणपतराव - शिवसेनारसाळ सुरेश नारायण - स्वाभिमानीबोरकर सचिन बाळासो - शिवसेनाखैरे भरत मंल्हारी - राष्ट्रवादी काँग्रेसभोंडवे सोपान जगन्नाथ - अपक्षरसाळ पंढरीनाथ बाळासो - अपक्षमोरे मिलींद तानाजी - अपक्षचांदगुडे संग्राम सुर्यकांत - मनसेचांदगुडे संग्राम सुर्यकांत - अपक्षमाळेगाव बु. पणदरे गटतावरे वैशाली शशिकांत - अपक्षवाबळे रोहिणी राहुल - काँग्रेसजाधवराव सोनाक्षी योगेंद्रसिंह - अपक्षवाघमोडे कल्याणी सुजित - अपक्षतावरे रोहिणी रवीराज - राष्ट्रवादी काँग्रेसतावरे विजया रणजनकुमार - भाजपतावरे उषादेवी धैर्यशिल - भाजपवडगाव निंबाळकर - मोरगाव गटखोमणे ईश्वर दगडू - अपक्षकाळे माणिक गुलाब - भाजपआगम निलेश दिलीप - अपक्षभगत सुनिल नारायण - अपक्षबनकर राहुल तुकाराम- अपक्षखोमणे रवींद्र शरद - भाजपभगत सुनिल नारायण - अपक्षखोमणे सतिश नामदेवराव - अपक्षकारंडे चांगदेव नामदेव - काँग्रेसढोले सुनिल दत्तात्रय - स्वाभिमानीदेवकाते विश्वासराव नारायण - राष्ट्रवादी काँग्रेसढोले सुनिल दत्तात्रय - अपक्षकरंजेपुल - निंबूत गटचौधरी अशोक यशवंत - अपक्षकाकडे प्रमोद भगवानराव - राष्ट्रवादी काँग्रेससोलनकर पप्पू पांडुरंग -अपक्षभोसले इंद्रजित संजीव - भाजपजाधव ज्योतीराम आप्पासो -भाजपभेलके शरद गुलाबराव - अपक्षगायकवाड तानाजी गुलाबराव - काँग्रेसगायकवाड तानाजी गुलाबराव - काँग्रेसजगताप हंबीरराव बबनसो - भाजपकाकडे धैर्यशिल रमेश - राष्ट्रवादीसांगवी -डोर्लेवाडी गटवाघमोडे कल्याणी सुजित - अपक्षदेवकाते शितल अमोल - अपक्षदेवकाते तेजश्री अविनाश - अपक्षतावरे आश्विनी युवराज - भाजपतावरे निलम राहुल - भाजपदेवकाते सुरेखा शंकर - अपक्षतावरे मिनाषी किरण - राष्ट्रवादी काँग्रेसदेवकाते शितल अमोल - शिवसेनादेवकाते नंदादेवी अरुण - भाजपसुपा गणकौले मंगल ज्ञानेश्वर - भाजपबारवकर निता संजय - राष्ट्रवादी काँग्रेसखोमणे सुनिता भारत - शिवसेनामेडद : गणकांबळे अर्चना सिताराम -बसपाभापकर सुवर्णा नानासो - भाजपमोरे मनिषा शरद - शिवसेनाआटोळे आश्विनी काका - रासपखराडे शारदा राजेंद्र - राष्ट्रवादी काँग्रेसचांदगुडे नंदाबाई वसंत - मनसेशिर्सुफळ : गणपवार संध्या प्रभाकर - अपक्षआटोळे जयश्री दीपक - भाजपगावडे लिलाबाई अशोक - राष्ट्रवादी झगडे प्रमिला पोपट - अपक्षलोखंडे मनिषा राजेंद्र - शिवसेनागुनवडी: गणगावडे गोरख नानासो - अपक्षखटके निलेश भारत - अपक्षगवारे धनंजय भुजंग - भाजपगावडे सचिन महादेव - भाजपगावडे भारत यशवंत - राष्ट्रवादी काँग्रेसकाटे सतिश अशोक - शिवसेनागावडे यशपाल महादेव - अपक्षगावडे किरण तुकाराम - अपक्षकाटे अजित रमेश - शिवसेनाजावळकर मधुकर परभत - अपक्षपोमणे गणेश संभाजी - मनसेमाळेगाव बु. : गणभोसले संजय पंडीत - राष्ट्रवादी काँग्रेसआवळे दयानंद सोमनाथ - अपक्षघोडके विशाल चंद्रकांत - अपक्षसातपुते संतोष नारायण - शिवसेनाकांबळे अजित दिपक - अपक्षभोसले रुपेश सायबु - भाजपपणदरे : गणकोकरे महादेव मारुती - रासपनाळे दिलीप भगवान - शिवसेनाकोकरे राजेंद्र माणसिंग - स्वाभिमानी पक्षकोकरे सदाशिव बाजीराव - भाजपकोकरे रोहित बळवंतराव - राष्ट्रवादी कोकरे दिग्विजय दिलीप - अपक्षगावडे दत्तात्रय नरसिंह - भाजपवडगाव निंबाळकर : गणथोरात सुरज सोनबा - अपक्षगोडसे राजेंद्र साहेबराव - अपक्षधापटे प्रदीप तुकाराम - राष्ट्रवादी काँग्रेसगाडेकर संतोष दादासो - अपक्षहिरवे रोहिदास सखाराम - अपक्षराजेनिंबाळकर राजेंद्र तुकाराम - काँग्रेसमाने सुनिल नारायण - भाजपमोरगाव : गणकाळे माणिक गुलाब - अपक्षखोमणे संजय लक्ष्मण - अपक्षबालगुडे बाळासाहेब मारुती - अपक्षभापकर बाळासाहेब विठ्ठल - शिवसेनापाटील विक्रमसिंह माणिकराव - रासपभोंडवे सोपान जगन्नाथ - अपक्षभोसले संजय सर्जेराव - भाजपभापकर राहुल दत्तात्रय - राष्ट्रवादी काँग्रेसकरंजेपूल गणसोरटे उज्वला दिलीप - भाजपगायकवाड नलिनी बबन - शिवसेनामगर मेनका नवनाथ - राष्ट्रवादी काँग्रेसनिंबूत :गणमहानवर मोनिका बापू - भाजपफरांदे निता नारायण - राष्ट्रवादी सांगवी : गणभोसले माधुरी सतिश- भाजपभोसले अबोली रतनकुमार - राष्ट्रवादी निकाळजे रुपाली अमोल -भाजपभोसले सारीका प्रकाश - भाजपडोर्लेवाडी : गणखामगळ गणेश मारुती - अपक्षकाळकुटे अनंदराव पांडुरंग - अपक्षवाघमोडे सुजित देवानंद - अपक्षचोपडे संदीप मारुती - रासपदेवकाते प्रकाश ज्ञानदेव - अपक्षसोलनकर पप्पू पांडुरंग - अपक्षदेवकाते निखिल चांगदेव - शिवसेनाजाधव अजित प्रल्हाद - भाजपजाधव अजित प्रल्हाद - अपक्षदेवकाते अमोल नरहरी - शिवसेनाझारगड राहुल विठ्ठल - राष्ट्रवादी काँग्रेसदेवकाते अमोल नरहरी - अपक्ष
बारामती तालुक्यात शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी
By admin | Updated: February 7, 2017 02:48 IST