शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेजलाईन फुटल्याने सांडपाणी बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 02:07 IST

मार्केट यार्डात प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्ड लगतीच्या आंबेडकरनगरजवळील महापालिकेची ड्रेनेजलाईन फुटली आहे. या ड्रेनेजलाईनमधील सर्व सांडपाणी थेट मार्केट यार्डमध्ये येत आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या सांडपाण्यामुळे बाजार घटाकातील आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित ड्रेनेजलाईन तातडीने दुरुस्त करण्याची मागणी कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

बाजाराच्या गेट क्रमांक ४ च्या बाजूस बाजार समितीच्या मोकळ्या जागेनजीक झोपडपट्टी आहे. या मोकठ्या जागेचा वापर उघड्यावर शौचालयास जाण्यासाठी नागरिकांकडून केला जातो. यामुळे येथे अगोदरच प्रचंड दुर्गंधी असते. त्यात मार्केट यार्ड पिछाडीला आंबेडकरनगरजवळील ड्रेनेजलाईन फुटल्याने त्यामधून येणारे सांडपाणी हे मार्केट यार्डमधील गेट नं. ४ मधून आतमध्ये येत आहे. त्यामुळे या परिसरामधे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सांडपाण्यामुळे रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. त्यामुळे ग्राहक व शेतकरी यांनी बाजार आवारामधे यायचे का नाही, असा प्रश्न केला जात आहे.श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी सांगितले, की महापालिकेच्या वतीने या परिसरात टाकलेली ड्रेनेज लाईन खूप जुनी व लहान आहे. या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे; परंतु ड्रेनेजलाईन लहान असल्याने अतिपाण्याचा ताण येऊन वारंवार फुटते. यामुळे या ड्रेनेजलाईनमधील सर्व सांडपाणी थेट मार्केट यार्डच्या परिसरात येते.याबाबत महापालिका आणि बाजार समितीच्या प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. ही ड्रेनेजलाईन तातडीने बदली करून नवीन ड्रेनेजलाईन टाकण्याची मागणी केल्याचे नांगरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणे