शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

पाणीगळतीमुळे बंधारा कोरडा

By admin | Updated: April 27, 2017 04:50 IST

भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील कोल्हापूर पद्धतीचा बांधलेला बंधारा पाणीगळतीमुळे कोरडा पडला आहे. त्यामुळे या भागातील

वडापुरी : भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील कोल्हापूर पद्धतीचा बांधलेला बंधारा पाणीगळतीमुळे कोरडा पडला आहे. त्यामुळे या भागातील शेकडो हेक्टर शेतीवरील असलेली पिके जळण्याच्या मार्गावर आहे. माणसासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने बंधाऱ्याच्या भिंतीची उंची वाढवून त्यावर ढापे बसवण्याची मागणी वडापुरी, सुरवड, अवसरी येथील शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे.भीमा नदीपात्रालगत असलेल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी भाटनिमगाव येथे सन २००५ मध्ये नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. मात्र, बंधारा बांधत असताना नदीपात्रातून पक्की भिंत न बांधता वरपासून खालीपर्यंत ढापे बसवण्यात आले आहे. त्या वेळी उन्हाळ्यात बंधाऱ्यातील पाणी सोडण्यावर संबंधित विभागाचे नियंत्रण होते. परंतु, काही कालावधी नंतर याकडे या विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाले व बंधारा फक्त इंदापूर व माढा तालुक्यामध्ये येण्या- जाण्यासाठी फक्त वापरला जात आहे. बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्यावाचून अडचणीत आली असल्याने या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील वडापुरी, सूरवड व अवसरी ही गावे पूर्वी भाटघर धरण साखळीतील धरणातून ५९ क्रमांक हा टेलचा फाटा असल्यामुळे पाटबंधारे खात्याकडून पाणी परवाना असूनदेखील पाणी मिळत नव्हते. यामुळे मोठ्या आशेने केलेल्या या पाणी योजनांना मात्र उन्हाळ्यात पाणी मिळतच नाही. मात्र, शेतकरी आजही बारमाही पाण्याची पाणीपट्टी भरत आहेत, बंधाऱ्याला नदी पात्रातून किमान पाच मीटर अखंड भिंत बांधून त्याच्यावर ढापे बसवण्याची गरज आहे.या वेळी हनुमंत जगताप, हरिभाऊ माने, ज्ञानदेव मगर, अनिल गायकवाड, सुनील शिंदे, केशव सुर्वे, दत्तात्रय घोगरे, रावसाहेब घोगरे, कल्याण गायकवाड, बाळासाहेब जाधव, शांताराम सावंत, अर्जुन कांबळे, सुभाष जाधव, दादासाहेब जगताप, सोपान भोसले, आदर्श शिंदे, शशिकांत पवार, शिवाजी सावंत आदि उपस्थित होते.