शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

डाॅ. ठाकुर यांच्या पदमुक्तीची ऑर्डर अडकली काेठे? ससूनमध्ये ऑर्डर ची प्रतीक्षाच

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: November 21, 2023 22:21 IST

डाॅ. देवकाते यांच्या निलंबनाची ऑर्डर मिळाली पण डाॅ. ठाकुर यांची गेली काेठे ?

ज्ञानेश्वर भाेंडे पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात चाैकशी समितीने ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकुर यांचा पदभार काढला तर अस्थिराेग विभागाचे पथकप्रमुख डाॅ. प्रवीण देवकाते यांचे निलंबन केले. यापैकी डाॅ. देवकाते यांची ऑर्डर आली पण डाॅ. ठाकुर यांची पदमुक्तीची ऑर्डर अदयापही आलेली नाही. त्यामुळे, वैदयकीय शिक्षण विभागाच्या प्रशासनाचे येथेही डाॅ. ठाकुर यांच्यावर विशेष ‘प्रेम’ असल्याची चर्चा ससूनमध्ये सूरू झाली आहे.

ललित पाटील प्रकरणात वैदयकीय शिक्षण संचालक डाॅ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ससूनच्या प्रकरणाची ओढून ताणुन चाैकशी झाली. चाैकशी अहवाल शासनाला सादर करूनही त्याबाबत लवकर कारवाई केली गेली नाही. न्यायालयाने डाॅ. ठाकुर यांचे पद रदद केल्यावरच वैदयकीय शिक्षण विभागाने ‘माैके पे चाैका’ मारत डाॅ. ठाकुर आणि डाॅ. देवकाते यांच्यावर कारवाई केली.

कारवाई केल्यावर डाॅ. देवकाते यांची निलंबनाची ऑर्डर बीजे प्रशासनाला दुस-या दिवशी तात्काळ मिळाली. परंतू, डाॅ. ठाकुर यांचा पदभार काढल्याची ऑर्डर बीजे प्रशासनाला मात्र, दहा दिवस लाेटले तरीही मिळालेली नाही. त्यामुळे, हा दुटप्पीपणा का, असाही प्रश्न आता विचारला जात आहे. यानंतर वरिष्ठ म्हणून डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांना अधिष्ठाता पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. दाेन दिवसांपासून डाॅ. शिंत्रे रजेवर असल्याने उपअधिष्ठाता डॉ. शेखर प्रधान यांना अधिष्ठाता पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.

दरम्यान याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांना विचारले असता ते म्हणाले की, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आले असून. या निर्णयाचा आदेश महाविद्यालय प्रशासन आणि डॉ. ठाकूर यांना पाठविण्यात आला आहे. परंतू, मग ऑर्डर अडकली काेठे असा प्रश्न आता उपस्थित हाेत आहे.

डाॅ. ठाकुर यांना सन्मानीय एक्झिट

डाॅ. ठाकुर यांना निलंबित करण्याऐवजी केवळ पदभार काढून शासनाने त्यांना ससूनमधील ड्रग्ज तस्करी आणि ड्रग्ज तस्कर ललित पाटील पंचतारांकित उपचार प्रकरणातून सन्मानीय एक्झिट दिल्याचीही चर्चा ससूनमध्ये रंगत आहे. दुसरीकडे डाॅ. देवकाते यांचा मात्र बळी दिल्याचीही कुजबूज हाेते आहे.