शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना ‘सरस्वती सन्मान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:11 IST

पुणे : के के. बिर्ला फाऊंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा २०२० चा ‘सरस्वती सन्मान’ प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे ...

पुणे : के के. बिर्ला फाऊंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा २०२० चा ‘सरस्वती सन्मान’ प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीस जाहीर झाला आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पंधरा लाख रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विजय तेंडुलकर यांच्या ‘कन्यादान’ (१९९३) आणि महेश एलकुंचवार यांच्या ‘युगान्त’ (२००२ ) नंतर १९ वर्षांनी हा सन्मान मराठी लेखकाला मिळाला आहे.

दरवर्षी के के. बिर्ला फाऊंडेशनच्या वतीने कविता, कादंबरी, नाटक, हास्य-व्यंग,ललित लेखन, आत्मकथा, समीक्षा आदी विविध प्रकारातील भारतीय भाषांमधील उत्कृष्ट कलाकृतींसाठी साहित्यिकांना ‘सरस्वती सन्मान’ प्रदान केला जातो. मात्र त्यासाठी लेखकाची कोणत्याही भाषेतील ही साहित्यकृती सन्मानाच्या दहा वर्षे आधीच्या कालावधीत प्रकाशित झालेली असावी, असा निकष ठेवण्यात आला आहे.

या सन्मानाच्या निवड समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष कश्यप (लोकसभा सचिवालयाचे माजी महासचिव, दिल्ली) असून इतर सदस्यांमध्ये गोविंद मिश्र (भोपाळ), प्रा. के. सच्चिदानंदन (सिमला), डॉ. बुद्धी नाथ मिश्र (डेहराडून), डॉ. किरण बुदकुले (गोवा), डॉ. सी. मृणालिनी (हैद्राबाद), डॉ. पारमिता सतपती त्रिपाठी (नवी दिल्ली), डॉ. सदानंद मोरे (पुणे), प्रा. ललित मंगोत्रा (जम्मू), दर्शन कुमार वैद (जम्मू), प्रियवत भरतिया (नवी दिल्ली), डॉ. सुरेश ॠतुपर्ण (नवी दिल्ली) यांचा समावेश होता.

मराठी वाङ्मयविश्वात डॉ. शरणकुमार लिंबाळे हे प्रतिभावंत कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. ‘अक्करमाशी’ या त्यांच्या आत्मकथनाला मराठी साहित्यात महत्वाचे स्थान आहे. हे त्यांचे पुस्तक इतर भारतीय भाषांसह इंग्रजीत भाषांतरित झाले आहे. त्यांच्या वैचारिक आणि परिवर्तनवादी लेखनाने दलित साहित्यात मोलाची भर घातली. ‘गावकुसाबाहेरील कथा’, ‘झुंड’, दलित प्रेमकविता, दलित ब्राह्मण, दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र, शतकातील दलित विचार आदी त्यांची विविध चाळीसहून अधिक पुस्तके प्रसिद्ध आहेत. नांदेडमध्ये २०११ साली झालेल्या बाराव्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन आणि भोसरीतील २०१९ च्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

चौकट

“देशातल्या एखाद्या दलित लेखकाला कदाचित पहिल्यांदाच हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळत आहे. आजवर आम्ही केवळ म्हणत असू, की आम्हाला मोठे पुरस्कार मिळायला हवेत. पण मिळत नव्हते. आम्ही ७० वर्षे लेखन केले. आज आपण देशाची ७५ वर्षे साजरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना एक पाहिलेलं सुंदर स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. भारतीय स्तरावर एक नवीन कलाकृती म्हणून या कादंबरीची दखल घेतली गेली आणि त्याचा सन्मान झाला याचा खूप आनंद आहे. दलित साहित्यात जीवनमूल्य आणि कलात्मकता आहे हे यातून सिद्ध झाले. एका जीवनवादी साहित्याचा हा गौरव आहे. भीमा-कोरेगाव लढ्याला दोनशे वर्ष पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर ‘सनातन’ कादंबरी लिहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी दलित-आदिवासींनी खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला. मात्र त्याची कुणीही दखल घेतली नाही. इतिहासात त्यांच्या योगदानाचा कुठेही गौरव झालेला नाही. त्यामुळे मी ‘सनातन’ मधून नवा इतिहास उभा केला. दलिताच्या संघर्षाचा गौरवशाली इतिहास सांगणारी ही कादंबरी आहे.”

-डॉ. शरणकुमार लिंबाळे, ज्येष्ठ साहित्यिक