:स.एम. सुपे मेमोरीयल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.संतोष सुपे व मी किशोरी उपक्रमाच्या प्रणेत्या स्त्री रोग तज्ञ डॉ. मंगल सुपे यांचा आदिवासी भागातील उल्लेखनीय कार्याबद्दल उजेडाचे मानकरी पुरस्कार देऊन नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, बेटी बचाव अभियान च्या डॉ. सुधा कांकरिया, डॉ.प्रकाश कांकरिया उपस्थित होते. स्त्री जन्माचे स्वागत करा व बेटी बचाव या देशव्यापी चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या देशव्यापी चळवळीला पस्तीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ''''उजेडाचे मानकरी'''' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सन्मानपत्र पगडी शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन हा पुरस्कार देण्यात आला. आदिवासी भागामध्ये गेली १५ वर्ष आदिवासी सामुदायिक विवाह सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. संतोष सुपे यांनी आज पर्यंत आठशे जोडप्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तनाचा दिवा पेटला आहे.दहावी व बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांना परीक्षेला जाता जाता या उपक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. आज पर्यंत १२० आरोग्य शिबिरे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, भोरगिरी भीमाशंकर मॅरेथॉन, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून गेली १५ वर्ष आदिवासींच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्यासाठी केलेल्या सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक सेवेबद्दल डॉ.संतोष सुपे यांना उजेडाचा मानकरी हा सन्मान देण्यात आला.
मी किशोरी....वयात येताना माझी जबाबदारी.... या उपक्रमाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींचे समुपदेशन करणाऱ्या व मुलींना वयात येतानाचे शारीरिक मानसिक बदल, आहार व त्यासंबंधी घ्यावयाची काळजी,चांगला व वाईट स्पर्श, लैंगिक शोषण या संबंधी जनजागृती करणाऱ्या डॉ. मंगल सुपे यांनी 20 पेक्षा जास्त शाळांमध्ये अडीच ते तीन हजार मुलींचे समुपदेशन मी किशोरी या उपक्रमाच्या माध्यमातून केले आहे.
उजेडाचे मानकरी'''' या पुरस्काराने सन्मानित करताना नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले , याप्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, डॉ. सुधा कांकरिया, डॉ.प्रकाश कांकरिया