शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:11 IST

पुणे : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर (वय ७९) यांचे ...

पुणे : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर (वय ७९) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांनी देशाच्या उच्च शिक्षणाला दिशा दिली आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मोलाचे योगदान दिले. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी निगवेकर यांचा उल्लेख ‘फादर ऑफ क्वालिटी एज्युकेशन इन इंडिया’ असा केला होता.

गेल्या काही महिन्यांपासून निगवेकर आजारी होते. सात वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन कॅन्सर झाला होता. सुमारे वर्षभरापासून ते घरीच होते. शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास हृदय बंद पडल्याने राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. निगवेकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी २०००-२००५ या कालावधीत सांभाळली. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पंधरावे कुलगुरू म्हणून त्यांनी १९९८ ते २००० काम पाहिले. देशातील विद्यापीठ, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनासाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल ॲसेसमेंट ॲण्ड ॲक्रेडिटेशन कौन्सिलचे ते संस्थापक -संचालक होते. पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख व मटेरियल सायन्सचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. तसेच पुण्यात सेंटर फॉर अॅडव्हान्स स्टडीज फिजिक्सची स्थापना केले. युनिवर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि कॅनडा येथील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टन ऑंटॅरिओ आदी ठिकाणी त्यांनी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम पाहिले. निगवेकर यांना विविध नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

विद्यापीठ कायद्यातील बदलासाठी राज्य शासनातर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. एक उत्तम शिक्षक प्रशासक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. त्याच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

---------

निगवेकर यांनी ग्रामीण भागातून येऊन स्वतःच्या कर्तृत्वावर आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर देशातील नामांकित संस्थांमध्ये प्रमुख पदांवर काम केले. विद्यार्थिप्रिय शिक्षक, अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने शिक्षणक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

- डॉ. शां. ब. मुजुमदार, संस्थापक -अध्यक्ष, सिंबायोसिस

-----

नॅकच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण गोष्टी केल्या. यूजीसीमध्ये आपल्या कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली. महाराष्ट्रातून उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक व्यक्ती पुढे आल्या त्यात निगवेकरांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात कामगिरी करणारा एक मोठा शिक्षणतज्ञ आणि आमचा सहकारी हरपला आहे.

डॉ.राम ताकवले, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ

--------

डॉ.अरुण निगवेकर हे उत्कृष्ट शिक्षक, उत्तम शैक्षणिक प्रशासक होते. नॅकचे जनक, यूजीसीचे अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आशा विविध शैक्षणिक संस्थानवर त्यांनी काम केले. देशाला त्यांचे शैक्षणिक योगदान विसरता येणार नाही.

- डॉ.अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ

------

विद्यार्थीप्रिय शिक्षक, उत्तम प्रशासक, भविष्याचा वेध घेणारे शैक्षणिक नेतृत्व म्हणून डॉ. निगवेकर यांची कारकीर्द स्मरणात राहील. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम आणि विद्यमान कुलपती डॉ. शिवाजीराव कदम सर यांच्यासह भारती विद्यापीठ परिवाराशी डॉ. निगवेकर यांचे अतिशय सौहार्दपूर्ण संबंध होते.

- डॉ. विश्वजीत कदम,प्र-कुलगुरू, भारती विद्यापीठ

डॉ. अरूण निगवेकरांच्या निधनाने आपण सर्वांनी एक मितभाषी व्यक्तिमत्व व महान शिक्षणतज्ज्ञ गमावला आहे. शिक्षणाचे माहेरघर अशी पुणे महानगरासमोरील बिरूदावली मिरविणे ज्या मोजक्या पुणेकर व्यक्तिमत्वांच्या अलौकिक कामगिरीमुळे शक्य झाले आहे, त्यात डॉ. निगवेकर सरांचा सिंहाचा वाटा आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद असेल वा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद त्यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण कामगिरीने ती पदे आणि दोन्ही संस्थांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते.

- सतीश मगर, अध्यक्ष, क्रेडाई नॅशनल