शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीशी लग्न करण्यासाठी पत्नीसह दहा महिन्यांच्या बाळाला संपवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 14:15 IST

पत्नीचा काटा काढल्यानंतरच तुझ्याशी लग्न करता येईल असं दत्ताने आपल्या प्रेयसीला सांगितलं होतं.

पिंपरी: प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी आपल्या पत्नी आणि दहा महिन्यांच्या बाळाची हत्या करवून आणल्याचा प्रकार हिंजवडीजवळील नेरे भागात भागात घडला आहे. यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव अश्विनी तर बाळाचे नाव अनुज असे आहे. दत्ता भोंडवे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणात दत्तासह त्याची प्रेयसी व दोन मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री नेरे येथे ही घटना घडली. सुरुवातीला दत्ताने आपल्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला करुन पत्नी-मुलाची हत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

३० वर्षीय दत्ता भोंडवेचे लग्नानंतरही एका महिलेशी प्रेमसंबंध होते. पत्नीचा काटा काढल्यानंतरच तुझ्याशी लग्न करता येईल असं दत्ताने आपल्या प्रेयसीला सांगितलं होतं. यानंतर दोघांनी मिळून ५०-५० हजार रुपयांची सुपारी देत दत्ताची पत्नी आश्विनी व मुलगा अनुजच्या हत्येचा कट रचला. पत्नी आणि मुलासह सासुरवाडीवरुन परतत असताना दत्ता भोंडवेने पाणी पिण्याच्या बहाण्याने मुंबई-बंगळुरु महामार्गावर मोटार थांबवली. यावेळी दोन अज्ञात इसमांनी मोटारीत शिरुन आश्विनी भोंडवे यांच्या तोंडावर रुमाल ठेवत गाडी जांभे गावाच्या पुढे नेण्याची धमकी दिली. मोटर पुढे गेल्यानंतर मारेकऱ्यांनी दत्ताच्या मानेवर चाकू लावला. मारेकऱ्यांनी या दोघांकडील पैसे आणि दागिने चोरले. यानंतर त्यांनी दत्तावर चाकूने वार केले. त्यानंतर दोन्ही मारेकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने आश्विनीचा गळा आवळून खून केला. यावेळी गाडीत असलेला दहा महिन्याचा अनुज रडायला लागल्यामुळे, त्याला गप्प करण्यासाठी दोन्ही मारेकऱ्यांनी त्याचीही हत्या केली. दोन्ही मारेकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने आश्विनीचा गळा आवळून खून केला. यावेळी गाडीत असलेला दहा महिन्याचा अनुज रडायला लागल्यामुळे, त्याला गप्प करण्यासाठी दोन्ही मारेकऱ्यांनी त्याचीही हत्या केली. दोघांचीही हत्या केल्यानंतर दत्ताने गाडीतील रोखरक्कम चोरीला गेल्याचाही बनाव रचला. मात्र पोलिसी खाक्यापुढे या आरोपींचं काहीही चालू शकलं नाही. या प्रकरणी सध्या चारही आरोपी हिंजवडी पोलिसांच्या अटकेत आहेत

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा