या प्रकरणी दत्तात्रय गणपतराव ढमढेरे (रा.गार्डन सिटी बिल्डिंग नंबर ११फ्लॅट नंबर ४०४, शिक्रापूर ता. शिरूर.) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान चोरट्यांनी ढमढेरे यांच्या सदनिकेचा दरवाजा तोडला. त्यांनी आत प्रवेश करत बेडरूममधील लाकडी कपाट उघडून त्यामधील ३ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, तसेच फ्लॅट नंबर ३०३ चे मालक जयवीर सिंग यांनी फिर्यादी कडे ठेवण्यास दीलेले ३ लाख २३ हजार किमतीचे दहा तोळे सोन्याचे दागिने व पाच हजार रूपये रोख असा सुमारे ६ लाख ६८ हजार रुपयाचा किमतीचे दागिने व रोख लंपास केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक उमेश तावसकर पुढील तपास करत आहेत.
सदनिकेचा दरवाजा फोडून सात लाखांचा एवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST