शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिक लढवय्ये... शिवसेनेने शस्त्रे टाकली आहेत, असे समजू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 07:25 IST

खासदार संजय राऊत; शिवसैनिक लढवय्ये

ठळक मुद्देलांडेवाडी येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून राऊत बोलत होेते. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेला वारंवार अपमानित केले

लोकतम न्यूज नेटवर्कमंचर (जि. पुणे) : सत्तेतला वाटेकरी हा सर्वात मोठा शत्रू असतो. शत्रू नको असेल तर विधानसभेला १५५ जागा निवडून आणण्यासाठी आपल्याला एकमेकांची गरज आहे. आज राज्यात वेगळी परिस्थिती असली तरी शिवसेनेने शस्त्रे टाकली आहेत, असे समजू नका. शिवसैनिक लढवय्ये असून पैशाने दहशत निर्माण कराल तर आमच्याकडे हिंमत आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केले.

लांडेवाडी येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून राऊत बोलत होेते. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेला वारंवार अपमानित केले. त्या वेदनेतून उडालेल्या ठिणगीमुळे मुख्यमंत्रिपद मिळाले. सरकार टिकवताना शिवसेना पक्षाला ताकद मिळाली पाहिजे. फाटक्या शिवसैनिकाने अनेक धनाढ्य लोकांना पराभूत केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जात-पात न पाहता शिवसैनिकाला मोठे केले. राज्यात वेगळी परिस्थिती असताना आम्ही शस्त्र टाकली असे समजू नका. शिवसैनिक लढवय्ये आहेत.महाराष्ट्रात तीन पक्ष सत्तेत असले तरी शिवसेना हे स्वतंत्र बेट तसेच महासत्ता आहे. ते विलीन करता येणार नाही. शिवसेनेचा सूर्य कधी मावळला नाही. आपला जन्म लढण्यासाठी झाला आहे. पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी संघटना बांधणीकडे लक्ष द्या. समोर कोण ताकदीचा आहे हे न पाहता सत्तेचे आपण वाटेकरी आहोत. सत्तेला टेकू शिवसेनेचा आहे. ही जाणीव होऊ द्या. पैशाने निवडणूक जिंकता येत असती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५० खासदार हवे होते, असे राऊत म्हणाले. 

राज्यपाल केंद्राचे पॉलिटिकल एजंट राज्यपाल हे केंद्राचे पॉलिटिकल एजंट असतात. त्यांची नेमणूक राजकीय असते. त्यामुळे त्यांची भूमिका तटस्थ नसते. आपले राज्यपाल हे केंद्रात मंत्री होते. ते भाजपचे सदस्य होते तसेच संघ प्रचारक होते. त्यामुळे भाजपला जे हवे आहे तेच ते करतील. ब्रिटिश काळातच राज्यपालांना ‘पाॅलिटिकल ॲडव्हायझर’ ही उपाधी दिली गेली आहे. राज्यात काय घडत आहे त्याची माहिती देण्याचे काम त्याकाळी राज्यपाल करत होते, असे राऊत यांनी राजगुरुनगर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना