शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

गाढवांचा बाजार २ कोटींवर, जेजुरीत पौष पौर्णिमा यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 02:14 IST

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया जेजुरीच्या खंडोबा देवाच्या पौष पोर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत दोन दिवस भरलेल्या गाढवांच्या बाजारात दोन कोटींवर रुपयांची उलाढाल झाली आहे. पौष पौर्णिमा यात्रा असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

जेजुरी - महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया जेजुरीच्या खंडोबा देवाच्या पौष पोर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत दोन दिवस भरलेल्या गाढवांच्या बाजारात दोन कोटींवर रुपयांची उलाढाल झाली आहे. पौष पौर्णिमा यात्रा असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती.दरवर्षी पौष पौर्णिमेला जेजूरीत मोठी यात्रा भरते. वैदू, कोल्हाटी, बेलदार, कैकाडी, वादारी, कुंभार, डोंबारी, परीट, पाथरवट, गारुडी आदी जाती-जमातींचे लोक यात्रेनिमित्त जेजूरीत आले आहेत. या जाती जमातीतील अनेक लोकांचा उदरनिर्वाह गाढवावर अवलंबून आहे. माती, विटा, वाळू, डोंगर पठारावर ओझी वाहून नेहण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. दरवर्षी तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत कुलदैवताच्या दर्शन बरोबरच गाढवांचा खरेदी विक्रीसाठी मोठ्या संख्येने लोक येतात.आधुनिक यंत्रयुगात वाहनाचा वापर वाढल्याने गाढवाच्या पाठीवरील ओझे कमी झाले आहे व त्यामुळे गाढवांच्या बाजाराला दिवसेंदिवस उतरती कळा सुरु झाली आहे. जेजुरीत काल रविवार (दि ३१) पासून बंगाली पटांगणात गाढवाच्या बाजाराला सुरुवात झाली. येथे जागा कमी पडत असल्याने पालखी तळावर ही बाजार भरलेला होता.या बाजारासाठी गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक या बरोबरच राज्यातील पुणे, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, जालना, नांदेड आदी भागातून व्यापारी तसेच विविध जाती-जमातीचे लोक या बाजारात सहभागी झाले होते.गाढव खरेदी करताना त्याचे दात व वय पाहिले जात होते. दोन दाताचा दुवान, चार दाताचा चवान, कोरा अखंड अशी निवड करून गाढवांची किं मत ठरवली जात होती. गावठी गाढवांना पाच हजारापासून किंमत मिळाली तर गुजरातमधील काटेवाडी गाढवांना सुमारे पंधरा ते तीस हजार रुपयापर्यंत किंमत मिळाली. या बाजारात दोन अधिक गाढवांची विक्री होऊन दोन कोटींवर रुपायांची उलाढाल झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले. गाढवाबरोबरच धनगरी घोड्यांचाही बाजार येथे भरला होता. सुमारे पन्नास घोडे विक्रीसाठी आले होते.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या