वाघोली : अयोध्येत सुरू असलेल्या राम मंदिर उभारणीसाठी वाघोली (ता. हवेली) येथील मीनाकाकी संजय सातव पाटील यांच्याकडून एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी वाघोलीत निधी संकलन समितीकडून मंदिर निर्माण हेतू निधी संकलन अभियान सुरू करण्यात आले असून, वाघोली येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर या ठिकाणी समिती व गावातील भजनी मंडळ,ग्रामस्थ व राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून गावातील भैरवनाथ मंदिरामध्ये पूजा करून गावांमध्ये फेरी काढण्यात आली, त्यानंतर निधी संकलन कार्याचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी कैलास महाराज सातव, कृष्णकांत सातव, संजय सातव पाटील, रामभाऊ दाभाडे, दादासाहेब सातव, रामकृष्ण सातव , गणेश कुटे, बाळासाहेब शिंदे, कैलास सातव, संतोष सातव, किसन महाराज जाधव, मीनाकाकी सातव, कविता दळवी आदींसह मान्यवर उपस्थित होते. या वेळी अनेक दानशूर व्यक्तींनी मंदिर उभारणीसाठी खारीचा वाटा म्हणून सहकार्य केले आहे.
राम मंदिर उभारण्यासाठी एक लाख रुपयांची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST