हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी प्रशांत कैलास खेडेकर यांच्या पुढाकाराने दरवर्षी विद्यालयातून इयत्ता दहावीतील प्रथम तीन क्रमांकासाठी कै. भगवान गोपाळा खेडेकर यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती दिली जाते.
२०१९ मध्ये प्रशांत खेडेकर यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या संस्थेतर्फे प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कार्यासाठी यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार २०१९ प्राप्त झाला होता. त्या पुरस्काराची रक्कम रुपये १५ हजार व त्यामध्ये आणखी १५ हजार रुपये असे एकूण ३० हजार रुपयांची देणगी शिष्यवृत्तीसाठी यापूर्वीच प्राप्त झालेली आहे.
या वेळी उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांचे वडील कैलास खेडेकर, आई संगीता खेडेकर, माजी सरपंच हिरामण खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप महादेव खेडेकर, बाळासाहेब मचाले, दीपक खेडेकर, हरिश्चंद्र खेडेकर, कैलास जाधव व मुख्याध्यापक रामदास जगताप उपस्थित होते. प्रदीप दुर्गाडे यांनी सर्वांचे स्वागत केले. तर हरिश्चंद्र खेडेकर यांनी आभार मानले.
फोटो : गुरोळी (ता. पुरंदर) येथे रामदास जगताप यांच्याकडे मदत देत असताना मान्यवर.