शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

देशी दारूच्या विक्रीत घट; '५०० मीटर'च्या आतील मद्यविक्री बंद करण्याच्या आदेशाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 12:43 IST

राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मद्यविक्रीमध्ये घट झाली आहे. देशी दारूच्या विक्रीत १५ टक्के, बीअरच्या विक्रीमध्ये ११ टक्के, तर विदेशी मद्य आणि वाईनच्या विक्रीत आठ टक्क्यांनी घट झाली आहे.

ठळक मुद्देदेशी दारूच्या विक्रीत १५ टक्के, बीअरच्या ११, तर विदेशी मद्य, वाईनच्या विक्रीत ८ टक्क्यांनी घटदेशी बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी घटली

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मद्यविक्रीमध्ये घट झाली आहे. देशी दारूच्या विक्रीत १५ टक्के, बीअरच्या विक्रीमध्ये ११ टक्के, तर विदेशी मद्य आणि वाईनच्या विक्रीत आठ टक्क्यांनी घट झाली असून, शहर व जिल्ह्यातील १ हजार ६१९ मद्यालये बाधित झाली आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शहरांमधून जाणारे महामार्ग या आदेशामधून वगळण्यात आले आहेत. महामार्गांवर होणाऱ्या अपघाताला मद्यपान जबाबदार असून, महामार्गांवरील ५०० मीटरच्या आतील मद्यालये बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाची १ जानेवारी २०१७ पासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. त्याचा फटका बसल्याने महसुलातही घट झाली होती.  एप्रिल २०१६ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत १ कोटी २६ लाख ५२ हजार ४५१ लीटर देशी दारू विकली गेली होती. तर चालू वर्षात २१ लाख ८९ हजार ४५४ लीटरने विक्रीमध्ये घट झाली असून, १ कोटी ४८ लाख ४१ हजार ९०५ लीटर देशी दारूची विक्री झाली आहे.

बीअरच्या विक्रीमध्येही घट देशी बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी घटली आहे. बीअरच्या विक्रीमध्येही एप्रिल ते आॅक्टोबर २०१६ पेक्षा २०१७ मध्ये ११ टक्क्यांनी घट झाली आहे. चालू वर्षात स्ट्राँग आणि माईल्ड बीअरची २ कोटी २६ लाख २७ हजार ४६० लीटरची विक्री झाली आहे. ही विक्री २०१६ पेक्षा ३१ लाख ८३ हजार ९१९ लीटरने कमी आहे. तर वाईनच्या विक्रीत ८ टक्क्यांची घट झाली असून, गेल्या वर्षी ६ लाख ६ हजार ५६३ लीटरची विक्री झाली होती.  

टॅग्स :liquor banदारूबंदीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड