शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप सुरुच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 19:42 IST

विद्यावेतनात ११ हजारांपर्यंत वाढ करावी या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे.

ठळक मुद्देतातडीच्या सेवा वगळता इतर सर्व विभागातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर या संपात सहभागी बाह्यरुग्ण विभाग, वार्ड, कॅथलॅब, रक्तपेढी, श्वानदंश विभागातील सेवा विस्कळीत

पुणे : विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी ससून सर्वोपचार रूग्णालयातील प्रशिक्षणार्थी (इंटर्न) डॉक्टरांनी पुकारलेला संप अद्याप सुरुच आहे. या संपामुळे रूग्णसेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली. मात्र, या संपाचा परिणाम रुग्णसेवेवर झाला नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला.  प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना दरमहा मिळणाऱ्या सहा हजार रुपये विद्यावेतनात ११ हजारांपर्यंत वाढ करावी या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. तातडीच्या सेवा वगळता इतर सर्व विभागातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे बाह्यरुग्ण विभाग, वार्ड, कॅथलॅब, रक्तपेढी, श्वानदंश विभागातील सेवा विस्कळीत झाली होती. प्रामुख्याने रुग्णांचे रक्ताचे नमुने घेणे, रुग्णाचा इतिहास घेणे, डॉक्टरांना सहाय्य करण्याची भूमिका प्रशिक्षणार्थी डॉक्टर पार पाडतात. त्यांच्या अनुपस्थितीत ही कामे निवासी डॉक्टरांना करावी लागत आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने ११ हजार वेतन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यासंदर्भात पाठपुरवठा करूनही ते वाढविण्यात आले नाही. दोन मे २०१८ रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्सच्या प्रतिनिधींना येत्या १५ दिवसात या विषयावर निकाल लावण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यावर गेल्या महिना-दीड महिन्यांत निर्णय झालेला नाही. त्यामुळे संपूर्णं महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. या बाबत माहिती देताना ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, बुधवारी (दि. १३) २२८ पैकी २२० प्रशिक्षणार्थी डॉक्टर गैरहजर होते. गुरुवारी (दि. १४) गैरहजर असणाऱ्या प्रशिक्षणार्थींचे प्रमाण २१७ इतके होते. या संपामुळे रुग्णांच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. 

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलdoctorडॉक्टरStrikeसंप