पिंपरी : रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेताना डॉक्टरांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते व नंतर उतारवयात अनेक व्याधींचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी आधी केले मग लोका सांगितले या उक्तीप्रमाणे पिंपरी - चिंचवड, मावळ व मुळशी परिसरातील डॉक्टर एकत्र येत दररोज नियमितपणे व्यायाम करीत आहेत. तसेच औषध , उपचारासोबतच व्यायामाचे महत्त्वही रुग्णांना पटवून देण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून अभिनव ग्रुपच्या माध्यमातून केला जात आहे.डॉक्टरांनी एकत्र येत २०१३ ला एंजॉय स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली. क्लबच्या माध्यमातून सभासद डॉक्टर दररोज सकाळी किमान दोन तास व्यायाम क रतात. दर वर्षी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. मागील वर्षी या स्पर्धेत शहरातील डॉक्टरांच्या १४ टीम सहभागी झाल्या होत्या. फेब्रुवारीत देहूरोड डॉक्टर असोशिएसन आयोजित डॉक्टर्स टू कॅन ट्रॉफी या स्पर्धेत एंजॉय संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले तर डॉ. संदीप पाटील यांना स्पर्धेचे मानकरीपद मिळविले. तसेच फन अॅण्ड फिटनेस हा २०० डॉक्टरांचा दुसरा ग्रुप आहे. त्यात आठवड्यातील पाच दिवस पंधरा जण किमान तीस किलोमीटर सायकलिंग करीत असतात. (प्रतिनिधी)वेगाने होणारा पर्यावरणाचा विनाश , वाढते प्रदूषण, भोगवादी जीवनशैली आणि आरोग्याविषयीची कमालीची उदासीनता या सर्व बाबींचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने आजार बरे करण्याबरोबर प्रतिबंधात्मक उपाय म्हणन नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून द्यावे व त्याचबरोबर स्वत:चे आरोग्य राखावे या हेतूने शहरातील डॉक्टर एकत्रित येऊन आरोग्याविषयी काम करीत आहोत. - डॉ. प्रवीण कोकडे, खजिनदार, फॅमिली फि जिशियन असोसिएशन
स्वत:च्या आरोग्यासाठी डॉक्टरांचा उपक्रम
By admin | Updated: April 6, 2016 01:18 IST