शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

तरंगत्या दवाखान्याला मिळेना डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:58 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने बोटीतील तरंगत्या दवाखान्यासाठी डॉक्टर नसल्याने दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा मिळत नसून या दवाखान्याची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे.

भोर : भाटघर धरणाच्या पाण्यामुळे संपर्क तुटलेल्या व अतिशय दुर्गम डोंगरी गावांतील लोकांना आरोग्यसेवा मिळावी, म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने बोटीतील तरंगत्या दवाखान्यासाठी डॉक्टर नसल्याने दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा मिळत नसून या दवाखान्याची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे.भाटघर धरणातील पाण्याच्या फुगवट्यामुळे दळणवळणाचा संपर्क तुटलेल्या भोरपासून सुमारे ५० ते ६० किलोमीटरवर धरणाच्या काठावर असलेल्या दुर्गम डोंगरी १५ ते २० गावांना या बोटीद्वारे बाह्य रुग्णसेवा नारळी पौर्णिमेला आॅगस्ट महिन्यात सुरू होत होती. ही सेवा धरणात पाणी असेपर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंत असे सात महिने पुरवली जाते. या सेवेसाठी १७ वर्षांपूर्वी इंडोजर्मन प्रकल्पातून २० लाख रुपयेकिमतीची बोट दिली आहे. बोटीत या तरंगत्या दवाखान्यासाठी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका, दोन शिपाई, कंपौंडर यांचे पथक आरोग्यसेवा पुरवते. बाधित गावात दवाखाना नसल्याने एखाद्या गावात अपघात, सर्पदंश झाल्यास, तसेच बाळंतपणासाठी महिला आल्यास त्यांना या तरंगत्या दवाखान्याच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी रुग्ण ही बोट ठेवण्यात आली आहे. आठवड्यातून पाच दिवस वैद्यकीय सेवा देणे अपेक्षित आहे. मात्र निधीची कमरता व डॉक्टराआभावी तसेच इंधनाचा खर्च यामुळे ही सेवा आठवड्यातील दोन दिवसच सेवा पुरवली जाते.भाटघर धरण भागातील मळ््याची सुतारवाडी, नानावळे, सांगवी वे. खो, बोपे, कुंबळे, भुतोंडे, डेरे, भांड्रावली, खुलशी, गृहिणी, चांदवणे या गावात आठवड्यातील दर बुधवारी व शुक्रवारी आरोग्यसेवा पुरवली जाते. मात्र मागील अनेक दिवसांपासून डॉक्टर उपलब्ध नसल्याने परिचारिकेतर्फे तात्पुरत्या उपाययोजना करून रुग्णांना परत पाठवले जात आहे. एखादा अपघात मोठा आजार किंवा प्रसूतीची सुविधा नसल्याने नागरिकांना ६० किलोमीटर भोरला यावे लागते. त्यामुळे शासनाने लाखो रुपये खर्च करून सुरू केलेल्या तरंगत्या दवाखान्याचा या दुर्गम भागातील ग्रामस्थांना कसलाच फायदा होत नाही. यामुळे या दवाखान्यासाठी एक तर डॉक्टर उपलब्ध करावा; अन्यथा दवाखाना बंद करावा, अशी मागणी जोगवडी प्राथमिक आरोग्य रुग्ण कल्याण समितीचे सदस्य मारुती रहाटवडे यांनी केली आहे.> दुर्गम डोंगरी भागातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा नसल्याने लोकांच्या आरोग्यासाठी असलेल्या भाटघर धरणातील तरंगत्या दवाखान्यात नागरिकांच्या औषध उपचारासाठी त्वरित वैद्यकीय अधिका-यांची नेमणूक केली जाईल.- प्रवीण माने,सभापती बांधकाम व आरोग्य समिती जि. प. पुणे