शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरवर निलंबनाची कारवाई, प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा झाला होता मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 02:45 IST

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने आपल्या बाळासह जीव गमवावा लागला.

पुणे : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने आपल्या बाळासह जीव गमवावा लागला. संबंधित डॉक्टरला तत्काळ निलंबित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेच्या सभेत सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला. सत्ताधारी सदस्यांसह सभागृहातील सर्वच सदस्यांची आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर संबंधित डॉक्टरला निलंबित केल्याचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी जाहीर केले. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले.स्मार्ट, मेट्रो सिटी असलेल्या पुणे शहरात गेल्या तीन वर्षांपासून आरोग्यप्रमुखाचे पद रिक्त आहे. अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टरच नाहीत, प्रचंड अस्वच्छता, वेळेवर औषध उपलब्ध होत नाहीत, यांसारख्या बाबींकडे महापालिका प्रशासन वारंवार दुर्दैवी घटना घडूनदेखील दुर्लक्ष करत आहे. महापालिका रुग्णालयातील गलथान कारभारामुळे सामान्य पुणेकरांचा जीव जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तसेच राजीव गांधी रुग्णालायतील डॉक्टरला तत्काळ निलंबित करण्यासाठी व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी सत्ताधारी सदस्यांसह संपूर्ण सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात डॉक्टर वेळेवर न आल्याने प्रसूतीसाठी आलेल्या आई व बाळाचा मृत्यू झाला होता. यासंबंधित डॉक्टरला त्वरित निलंबित करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. या प्रकरणात डॉ. विजय बडे यांना निलंबित करण्यात आले. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.