शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरनेच लपवला महिला डॉक्टरांच्या स्नानगृहात स्पाय कॅमेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या स्नानगृह व शयनकक्षात स्पाय कॅमेरा लावण्यामागे एका डॉक्टराचा हात असल्याचे ...

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या स्नानगृह व शयनकक्षात स्पाय कॅमेरा लावण्यामागे एका डॉक्टराचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी सुजित आबाजीराव जगताप (वय ४२) या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. जगतापने ॲमेझॉनवरून स्पाय कॅमेरा बल्ब मागवल्याचे तपासात समोर आले आहे. हा प्रकार ६ जुलैला घडला होता. सुजित जगताप हा एमडी असून त्यांचे हिराबाग येथे क्लिनिक आहे. भारती विद्यापीठ परिसरातील एका रुग्णालयात जगताप लेक्चरसाठी गेला होता.

याप्रकरणी एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांनी फिर्याद दिली होती. या महिला डॉक्‍टर एका नामांकित महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात काम करतात. या रुग्णालयाच्या सर्व्हिस क्वार्टरमध्येच त्या आणखी एका महिला डॉक्‍टरांसह राहतात. मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयातील काम उरकल्यावर त्या खोलीवर परतल्या होत्या. यावेळी स्नानगृहातील दिवा न लागल्याने त्यांनी दुरुस्तीसाठी तंत्रज्ञाला बोलावले. त्याने दुरुस्तीसाठी बल्बचे होल्डर उघडल्यावर आत स्पाय कॅमेरे, त्याचे मेमरी कार्ड आणि बॅकअप आढळला. शयनकक्षातील बल्बचे होल्डर उघडल्यानंतर तेथेही असाच प्रकार आढळून आला. यानंतर संबंधित महिला डॉक्टरने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.

या गुन्ह्याचा तपास करताना गेल्या ४ दिवसांपासून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही पाहात होते. सुरक्षा रक्षक, फिर्यादी यांना संशय वाटत असलेल्यांकडे चौकशी करत होते. दरम्यान, एका सीसीटीव्हीमध्ये डॉ. जगताप कैद झाला होता. त्याला चौकशीसाठी बोलविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

चौकट

पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी सांगितले, “सुजित जगताप हा मेंदूविकारतज्ज्ञ आहे. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस या आरोपीपर्यंत पोहोचले. हे कृत्य आरोपीने का केले हे अजूनही त्याने सांगितलेले नाही.” दरम्यान, हे घृणास्पद कृत्य का केले, कधी केले, हे आपल्याला आठवत नसल्याचे जगताप सांगत असल्याचे सूत्रांनी सांगितले.