शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबद्दल तुम्हाला या अाठ गाेष्टी माहित आहेत का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:21 IST

आॅक्सफर्ड अाॅफ द इस्ट अशी अाेळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विविध वैशिष्टे अाहेत. या विद्यापीठाला शैक्षणिक वारश्याबराेबरच माेठा एेतिहासिक वारसा सुद्धा लाभला अाहे.

पुणे :  नुकताच देशातील सर्वाेत्कृष्ट विद्यापीठांच्या रॅंकिंगमध्ये राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अव्वल ठरले अाहे. तर देशात विद्यापीठाने पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले अाहे. पुणे विद्यापीठाला अाॅक्सफर्ड अाॅफ द इस्ट असे म्हणतात. विद्यापीठात देशातूनच नव्हे तर जगभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. विद्यापीठाला जशी शैक्षणिक अाेळख अाहे, तशीच विद्यापीठातील इतर वास्तू अाणि परंपरांच महत्त्वही माेठं अाहे. 1. विद्यापीठाची मुख्य इमारत हाेती इंग्रज गव्हर्नरची  राहण्याची वास्तूसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना सन 1949 साली करण्यात अाली. विद्यापीठाची जी मुख्य इमारत अाहे ती इंग्रजांच्या काळातील गव्हर्नरची पावसाळ्यातील दिवसांमधील राहण्याची वास्तू हाेती. सन 1864 तेे 1871 या काळात हि इमारत बांधण्यात आली हाेती. या इमारतीसाठी 1.75 हजार पाऊंड रुपयांचा खर्च अाला हाेता.

2. सात लाखाहून जास्त अाहे विद्यापीठाची विद्यार्थी संख्याविद्यापीठातील विविध भागातील तसेच विद्यीपाठाशी सलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी मिळून सात लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत अाहेत. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत अहमदनगर तसेच नाशिक विभागही येतात. 

3. ललित कला केंद्र गुरुकुल पद्धतीने नाट्यकलेचं शिक्षण देणारं ललित कला केंद्र देशभरात प्रसिद्द अाहे. या केंद्राने अनेक कलाकार चित्रपट सृष्टीला दिले अाहेत. येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या केंद्रात राहूनच शिक्षण घ्यावे लागते. ज्येष्ठ नाटककार सतिश अाळेकर यांच्या प्रयत्नातून या केंद्राची स्थापना करण्यात अाली. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने सुद्धा या केंद्रातूनच नाट्यकलेचं शिक्षण घेतलं हाेतं. 

4. विद्यापीठातील भुयारी मार्गविद्यापीठाच्या पाेतदार संकुलापासून मुख्य इमारतीपर्यंत जाणारा 250 ते 300 फूट लांबीचे भुयारी मार्ग अाहे. इंग्रजांच्या काळात जेवण वाहून नेण्यासाठी या भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात अाली हाेती. त्याकाळी इंग्रज भारतीयांना गुलामाची वागणूक देत असल्याने इंग्रजांकडे येणाऱ्या पाहुण्यांना येथील कामगार दिसू नयेत म्हणून हा भुयारी मार्ग वापरला जात असे. 

5. जयकर ग्रंथालयविद्यापीठातील ग्रंथालयाचा इतिहासही माेठा अाहे. महाराष्ट्रातील सर्वात माेठं असं हे ग्रंथालय अाहे. त्याचबराेबर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुद्धा या ठिकाणी अाहेत. विविध विषयांवरील पुस्तके या ग्रंथालयात विद्यार्थ्यांना वाचण्यास मिळतात. त्याचबराेबर अांबेडकरांवरील स्वतंत्र दालनही या ग्रंथालयात तयार करण्यात अाले आहे. 

6. विद्यावाणी रेडिअाे केंद्र विद्यापीठाचे स्वतःचे स्वतंत्र असे कम्युनिटी रेडिअाे केंद्र अाहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम या कम्युनिटी रेडिअाेच्या माध्यमातून चालविले जातात. नाट्यवाचन, कथावाचन असे विविध कार्यक्रम या माध्यमातून सादर केले जातात. त्याचबराेबर विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर हे या रेडिअाे केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. तसेच त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असतात. 

7. सायकल याेजनाशेअर सायकल याेजना हि सर्वप्रथम विद्यापीठात सुरु करण्यात आली. या याेजनेला विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी माेठा प्रतिसाद दिल्याने शहराच्या इतर भागातही हि याेजना राबविण्यात आली. विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये जाण्यासाठी या सायकलींचा वापर विद्यार्थी करत अाहेत. पुढील काळात वाहनांची संख्या कमी करुन जास्तीत जास्त पर्यावरण स्नेही परिसर करण्याचा विद्यापीठाचा मानस अाहे. 

8. निसर्गरम्य परिसरविद्यापीठाचा परिसर हा 411 एकर इतका विस्तीर्ण अाहे. विद्यापीठाचा बराचसा परिसर हा झाडाझुडपांनी व्यापला आहे. विद्यापीठाचा प्रत्येक रस्ता हा हिरवळीने अच्छादलेला अाहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमाेर विविध फुलांची बागही अाहे. विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरामुळे विद्यार्थ्यांची विद्यापीठाला पसंती असते.      

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकर