पुणे : दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून दोन भावांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करीत त्याच्या गळ्यातील दोन लाखांच्या सोनसाखळ्या हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास पर्वतीजवळील लक्ष्मीनगर येथे घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.किरण राजू दांडेकर आणि मधुकर राजू दांडेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेश धावडे (वय ४०, रा. पर्वतीदर्शन) यांनी फिर्याद दिली आहे. धावडे लक्ष्मीनगरमधील डॉ. आंबेडकर वसाहतीजवळील हनुमान मंदिरासमोर उभे होते. त्या वेळी दोघेही आरोपी तेथे जाऊन दारू प्यायला पैसे मागितले. त्यांना पैसे देण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या आरोपींनी धावडे यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. त्यांच्या डोक्यात वार करून गळ्यातील दोन सोनसाखळ्या हिसकावत पळ काढला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
दारूला पैसे दिले नाही म्हणून हल्ला
By admin | Updated: September 13, 2015 01:54 IST