शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
13
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
14
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
15
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
16
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

अन्याय होऊ देणार नाही : पालकमंत्री

By admin | Updated: August 10, 2016 00:59 IST

मावळच्या जनतेवर आन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मावळ पवनानगर येथील श्रद्धांजली सभेत व्यक्त केले.

पवनानगर : मावळच्या जनतेवर आन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मावळ पवनानगर येथील श्रद्धांजली सभेत व्यक्त केले. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला बंद जलवाहिनीने पाणी नेण्याला विरोध करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर ९ आॅगस्ट २०११ रोजी झालेल्या आंदोलनात तीन शेतकरी मरण पावले. या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी पवनानगर येथे शोकसभेचे आयोजन केले होते. या वेळी बापट बोलत होते. तत्कालीन सरकारने बंद जलवाहिनीबाबत निर्णय घेताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. यासह आंदोलनही चुकीच्या मार्गाने हाताळले. यामुळे शेतकऱ्यांचे बलिदान गेले. पण, आता आपण शासनाचा प्रतिनीधी असून, मावळचेच पुत्र आहोत. यामुळे मावळच्या जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. पाण्यावर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. हा प्रश्न मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा असल्याची मला जाणीव आहे. हा प्रश्न सोडवताना शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या मनाप्रमाणेच प्रश्न सोडवू. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, तर शहीद शेतकऱ्यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमासाठी गिरीष बापट, आमदार संजय भेगडे, केशव वाडेकर, माजी आमदार दिगंबर भेगडे, प्रशांत ढोरे, मच्छिंद्र खराडे, एकनाथ टिळे, भारत ठाकूर, सविता गावडे, दीपाली म्हाळस्कर, गणेश भेगडे, रवींद्र भेगडे, जितेंद्र बोत्रे, सचिन शेळके आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित नागरिकांनी गोळीबार प्रकरणातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. पवना जलवाहिनी रद्द करण्याबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.(वार्ताहर)श्रद्धांजली सभेनंतर शेतकरी नाराजचपवनानगर : पवना बंद जलवाहिनी आंदोलनात शहीद झालेल्या मोरेश्वर साठे, कांताबाई ठाकर, श्यामराव तुपे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आले. मात्र, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊ, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करण्याबाबत कसलीही घोषणा न केल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध दर्शविण्यासाठी केलेल्या आंदोलनात तीन शेतकरी शहीद झाले होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, भाजपा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊ, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करू, अशी आश्वासने सत्तेत येण्यापूर्वी मावळ तालुक्यातील प्रचारावेळी भाजपाने दिली. मात्र, भाजपा व शिवसेना युतीचे सरकार येऊन दोन वर्षे झाली, पण या आंदोलनातील १९८ शेतककऱ्यांवरील गुन्हे अद्यापही मागे घेतले नाही. यामुळे मंगळवारच्या शोकसभेत पालकमंत्री पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्दची घोषणा करावी व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन द्यावे, अशी अपेक्षा होती. मात्र, याबाबत पालकमंत्री काहीही स्पष्ट न केल्याने सभा संपल्यानंतर नाराजीची चर्चा होती. वडगावमधील बाळासाहेब शिंदे या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी व शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खांद्यावर भगवा झेंडा घेऊन गेली ४ वर्षे वडगाव ते पवनानगर हा परतीचा प्रवास ते करत आहेत. या वर्षीदेखील ते चालत या शोकसभेसाठी आले होते.