शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुद्द्याला बगल नको, सुळेंंची कामे दाखवा : शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 02:36 IST

कामाच्या मुद्द्याला बगल देऊन वैयक्तिक शेरेबाजी करण्याऐवजी सुळे यांनी कामे दाखवावित असा खोचक टोला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी लगावला.

सासवड : मागील चार वर्षांत पुरंदर तालुक्याने विकास प्रक्रियेत चांगली कामगिरी केलेली आहे. तालुक्याचा चेहरामोहरा हळूहळू बदलू लागला आहे. बारामती घडायला ५० वर्षं पवार कुटुंबाला राजकारण करावे लागले. पुरंदर-हवेली मतदारसंघ अवघ्या नऊ वर्षांत त्या दिशेने आगेकूच करताना पाहून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या भवितव्याच्या चिंतेने घेरले आहे. कामाच्या मुद्द्याला बगल देऊन वैयक्तिक शेरेबाजी करण्याऐवजी सुळे यांनी कामे दाखवावित असा खोचक टोला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी लगावला.रावडेवाडी (गराडे) येथे खर्चाच्या पाझर तलाव भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमाला सभापती अर्चना जाधव, माजी सभापती अतुल म्हस्के, दादा घाटे, उपसभापती दत्तात्रय काळे,जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, शालिनीताई पवार, ज्योती झेंडे, पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, नलिनी लोळे, शाखाप्रमुख भास्कर जाधव, सदाशिव रावडे, गणेश रावडे, दादा रावडे, उल्हास जगदाळे उपस्थित होते. या वेळी माजी उपसरपंच बाळासाहेब रावडे, विशाल रावडे, सागर रावडे, शांताराम रावडे, संजय रावडे, पांडुरंग जगदाळे, प्रमोद फडतरे, भाऊसाहेब रावडे, म्हस्कु रावडे, रामदास रावडे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला.राष्ट्रीय महामार्ग, ग्रामसडक योजनेतून होत असलेला ग्रामीण रस्त्यांचा कायापालट, जलसंधारणातील विक्रमी यश, जेजुरीतील भव्य ग्रामीण रुग्णालय, आरटीओ सुविधा, सिमेंट बंधाऱ्यांचे जाळे, पुरंदर उपसा आणि जनाईचे अवघ्या १९ टक्के शुल्कात मिळणारे पाणी या व अशा अनेक कामांमुळे पुरंदर तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी सैरभैर झालेली आहे. विमानतळाच्या मुद्द्यावर दोनही पक्षांना अजुन निश्चित भूमिका ठरवता आलेली नाही. तेच आता तालुक्याच्या विकासाच्या गप्पा मारत आहेत. त्यांना खासदार सुळे यांची कामे दाखवा म्हटल्यावर राग येतो. यांच्या कामावर सेल्फी काढावेत आणि जनतेला दाखवावेत असेही शिवतारे म्हणाले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस