शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

डॉक्टरांबद्दल समाजाचा दुराग्रह नको

By admin | Updated: March 25, 2017 04:07 IST

समाजात डॉक्टरांप्रती असलेला आदर कमी झाला आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब आहे.

समाजात डॉक्टरांप्रती असलेला आदर कमी झाला आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब आहे. डॉक्टरांकडे पाहण्याच्या समाजाचा दृष्टीकोन असाच राहिला आणि समाजाने अशा प्रकारचा दुराग्रह बाळगला तर वैद्यकीय क्षेत्राकडील तरुणांचा कल कमी होईल. त्यामुळे समाज चांगल्या डॉक्टरांचा मुकेल, असे मत ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.के.एच.संचेती यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. डॉक्टरांनी आर्थिक पारदर्शकता बाळगावी आणि सामान्यांशी संवाद वाढवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकांकडून होणारी मारहाण चिंताजनक आहे. आजकाल लोकांमधील संयम कमी झाल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. कायदा हातात घेणे हा पर्याय होऊ शकत नाही. समाजाने डॉक्टरांबद्दल असाच दुराग्रह बाळगला आणि संशयी दृष्टिकोन ठेवला तर तरुण पिढी या व्यवसायात येताना दहादा विचार करेल. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांची संख्या घटली तर समाज चांगल्या डॉक्टरांना मुकेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘रुग्णाची प्रकृती गंभीर असेल तर नातेवाइकांची मानसिकता बदलते. डॉक्टरांबद्दल त्यांच्या मनात संशय निर्माण होतो. गंभीर परिस्थितीत कोणतेही उपचार सुरू केल्यानंतर परिणाम दिसायला थोडा वेळ लागतो. मात्र, तेवढा संयम बाळगला जात नाही. डॉक्टरांबद्दलचा आदरही दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा वेळी, डॉक्टर आणि समाज यांच्यामध्ये संवाद होणे आवश्यक आहे. हा संवाद वाढवण्याची जबाबदारी डॉक्टरांवरच जास्त आहे. त्यांनी आर्थिक पारदर्शकता बाळगायला हवी. डॉक्टरकडे वेळ नाही, ते रुग्णांना पुरेशी समाधानकारक उत्तरे देत नाहीत, अशी तक्रार रुग्णांकडून ऐकायला मिळते. डॉक्टर पैसे उकळतात, असा समजही सर्वदूर पसरलेला दिसतो. तो काहीसा रास्त आणि काहीसा अनाठायी आहे. हा समज दूर करण्यासाठी डॉक्टरांनी नातेवाइकांना रुग्णाची परिस्थिती शांतपणे समजावून सांगायला हवी, उपचारांसाठी लागणारा वेळ, खर्च, संभाव्य धोका आदी बाबींची कल्पना द्यायला हवी. अशा संवादातून गैरसमज दूर होऊ शकतील.हाडांचे दुखणे लोक गांभीर्याने घेत नाहीत, असेही संचेती म्हणाले. ‘नियमित व्यायाम, सकस आहार ही आरोग्यसंपन्न जीवनाची गुरुकिल्ली आहे. केवळ चालण्याचा व्यायाम करुन सुदृढ राहता येत नाही. स्नायूंच्या विकासासाठी सूर्यनमस्कार हा जगातील सर्वोत्तम व्यायाम आहे. त्यामुळे सर्वांनी व्यायामावर भर द्यायला हवा. बरेचदा हाडांचे दुखणे अंगावर काढले जाते. दुर्लक्ष केल्याने काही कालावधीने मोठे दुखणे उद्भवते. त्यामुळे रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत. आजकाल अद्ययावत तंत्रज्ञानामुळे उपचार आणि शस्त्रक्रिया सुलभ झाल्या आहेत. रोबोटिक आॅपरेशनचे तंत्रज्ञानही वेगाने वाढत आहे. यामध्ये डॉक्टरऐवजी संगणकाच्या सूचनेनुसार डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे रोबोच शस्त्रक्रिया पार पाडतो. सध्या नेव्हिगेशन सिस्टिममध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.सांधारोपण आणि हाडे बसवण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये खूप प्रगती झाली आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर एक-दोन दिवसांत रुग्णाला घरी जाता येते, त्याच्या प्रकृतीतही झपाट्याने सुधारणा होते. शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनाही तंत्रज्ञानामुळे कमी झाल्या आहेत. मात्र, वैद्यकीय सेवा महागड्याही झाल्या आहेत. अद्ययावत उपकरणे, औषधोपचारांच्या किमती वाढल्याने वैद्यकीय सेवेवरील खर्च वाढला आहे. भविष्यात, कमी खर्चात होणाऱ्या शस्त्रक्रियेचे संशोधन होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी घरातून झालेल्या कौतुकाचे मोठेपण वेगळेच असते. पुणे ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. त्यामुळे प्रतिष्ठेचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर होणे, ही आनंदाची बाब आहे. ८१ व्या वर्षी पुरस्कार मिळत असल्याने इच्छाशक्ती आणि कार्यक्षमता वाढीस लागते. अजूनही अनेक वर्षे रुग्णांची सेवा करायची आहे. अनेक वर्षे काम करून रुग्णांच्या वेदना दूर करायच्या आहेत, अशी भावना डॉ. संचेती यांनी पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली.