शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फसवू नका, वापरू नका, प्रामाणिक राहा, शिवसैनिकांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 01:18 IST

शिवसैनिकांची भावना : महापालिकेतही हवा वाटा, भाजपाकडून होते फसवणूक

राजू इनामदार 

पुणे : पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला, एकदम मान्य आहे, लोकसभेत आम्ही प्रामाणिकपणे काम करू, पण तुम्ही विधानसभेला फसवू नका’ अशीच युतीनंतर सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे. वेगवेगळो लढलो तरीही आता स्थानिक संस्थांच्या सत्तेतही आम्हाला वाटा हवा, साहेबांनी तशी अट घालायला होती, असे त्यांना मनोमन वाटते आहे.

स्वबळाची भाषा उच्चार करणाऱ्या भारतीय जनता पार्टी व शिवसेना अशा दोन्ही पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर युती झाली आहे. मित्र पक्ष सोडून जात असताना भाजपासाठी ही युती महत्त्वाची होती, तर राजकीयदृष्ट्या अस्पृश्य व्हायचे नसेल तर भाजपा हाच उत्तम पक्ष आहे असे लक्षात आल्यामुळे शिवसेनेनेही फार ताणून धरले नाही. मात्र नेत्यांमध्ये झालेल्या या युतीच्या निर्णयाचा सामान्य शिवसैनिकांवर काय परिणाम झाला, तो युतीसाठी तयार आहे का, याचा कानोसा घेतला असता मात्र त्यांच्यात भाजपाकडून फसवणूक होते हीच भावना असल्याचे दिसते आहे.शिवसैनिक भाजपा उमेदवाराचा अतिशय मनापासून, भावनेने प्रचार करतात, निवडणूक आहे तोपर्यंत भाजपाच्या नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सगळे गोड बोलतात, पण निवडणूक संपल्यावर एकदम दूर लोटतात असा अनुभव असल्याचे काही शिवसैनिकांनी स्पष्ट केले. गल्लीबोळातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना शिवसैनिक नको असतात, ते कार्यक्रम भाजपाचेच होतील यासाठी त्याची सगळी धडपड असते. प्रचाराला बोलावणारे, कार्यक्रमांना मात्र बोलवत नाहीत अशी बहुसंख्य शिवसैनिकांची तक्रार आहे.लोकसभेच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरच विधानसभेचा जागा वाटप होण्याची दाट शक्यता आहे. आकडेवारी लिहून ठेवण्यात, तिचा दाखला देण्यात शिवसैनिक कमी पडतो. भावनेच्या जोरावर त्याचे काम असते. भाजपाचे लोक मात्र कोणताही प्रभाग शिवसेनेने मागितला तरी तिथे लोकसभेला झालेल्या मतदानाची आकडेवारीच समोर ठेवतात व त्या जागेवर दावा करतात. विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागाच्या मतदानाची सविस्तर आकडेवारी, त्यावरचे निष्कर्ष त्यांच्याकडे लेखी असतात. जागा वाटप चर्चेच्या वेळी ही आकडेवारी दाखवत ते शिवसेनेचा दावा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असतात असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांचा अनुभव फारच विचित्र असल्याचे शिवसैनिक सांगतात. महापालिका निवडणुकांमध्ये त्यांना एकतर शिवसेनेला प्रभाग द्यायचा नसतो, दिला तर ते तेथील उमेदवाराचा प्रचार करतच नाहीत, दुसºया प्रभागात जिथे भाजपाचा उमेदवार असेल तिथेच त्यांचा मुक्काम असतो. आहे की, येतो की, असे दाखवल्यासारखे करत प्रत्यक्ष प्रचारात ते कधीही सहभागी होत नाहीत. शिवसेनेचा कोणीही माणूस संघटनात्मक किंवा पदाधिकारी स्तरावर मोठा होऊच द्यायचा नाही असेच त्यांचे धोरण असते, असे बºयाच शिवसैनिकांनी सांगितले.आदेशावरच शिवसेना चालतेय...गोड बोलणे हा भाजपा कार्यकर्त्यांचा, तर उसळून भांडणे किंवा एकदम जीवतोड मदत करणे अशा भावनेच्या लाटेचा शिवसैनिकांचा स्वभाव आहे. स्वबळावर निवडणूक लढवावी अशीच अनेक शिवसैनिकांची इच्छा होती. नेते मात्र भाजपावर टीका करत असले तरी वास्तवाचाही विचार करत होते. त्यातूनच युती झाली आहे. आदेशावरच शिवसेना चालत असल्याने ती कार्यकर्त्यांनी मान्यही केली आहे. मात्र आम्हाला फसवू नका, वापरू नका, प्रामाणिक राहा असे त्यांचे म्हणणे आहे.भावना नाही,आदेश महत्त्वाचाभावना काहीही असली तरी सामान्य शिवसैनिक काय किंवा शिवसेनेचे पदाधिकारी काय, पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार काम करणार. शिवसेनेत आदेशाचा पायमल्ली चालतच नाही. भाजपाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे, आम्ही त्यांना प्रामाणिकपणे लोकसभेसाठी मदत करणार, विधानसभेचे जागा वाटप हा पुढचा प्रश्न आहे, त्याविषयी आताच बोलणे योग्य नाही.- चंद्रकांत मोकाटे, माजी आमदार, शिवसेना शहरप्रमुख

टॅग्स :Puneपुणे