शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डीएसके पोलीस कोठडीत जखमी, ससून रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 07:03 IST

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) पोलीस कोठडीत तोल जाऊन पडल्यामुळे जखमी जखमी झाले आहेत. त्यांना पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. 

पुणे: पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) पोलीस कोठडीत तोल जाऊन पडल्यामुळे जखमी जखमी झाले आहेत. त्यांना पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. 

उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन काढून घेतल्यानंतर शनिवारी (17 फेब्रुवारी) पहाटे डी.एस. कुलकर्णी यांना पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी पुण्यात न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत  7 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणीच्या दरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी डीएसके यांनी त्यांच्या 7 प्रमुख भागीदार संस्थांमधून मोठ्या प्रमाणावर ठेवी गोळा केल्या आहेत. त्यातील मोठा भाग हा त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये वळविला आहे. त्यानंतर त्या खात्यातून तो डीएसके, त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी व इतरांच्या वैयक्तिक खात्यात वळविण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर रात्रीच्या सुमारास डीएसके पोलीस कोठडीत तोल जाऊन पडल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला जखम झाली असून त्यांना पोलिसांनी उपचारांसाठी येथील ससून रुग्णालयात दाखल केले आहे. 

उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांचा जामीन काढून घेतला. असा निर्णय होणार असल्याची जाणीव असा काही निर्णय होऊ शकतो याची जाणीव असल्याने डीएसके अगोदरच पसार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) चार पथके  मुंबई, दिल्ली व इतर ठिकाणी रवाना केली होती.  डीएसके यांच्या मोबाइलवरील कॉल रेकॉर्डवरुन ते दिल्लीत असल्याचे पोलिसांना समजले.  सायबर क्राईमचे दोन अधिकारी व कर्मचारी हे अगोदरच दिल्लीला होते. दिल्लीतील वसंत कुंज भागातील डीएमसी क्लबमध्ये शनिवारी पहाटे दोघांना ताब्यात घेण्यात आले. विमानाने त्याना सायंकाळी पुण्यात आणले. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्या नंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या समोर हजर केले गेले.

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सांगितले की, कुलकर्णी यांनी आपल्या प्रमुख ६ भागीदारी संस्थांमधून १ हजार ३५३ कोटी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या आहेत. २०१५ पासून कंपनीचे काम व्यवस्थित सुरु नव्हते. त्यांनी १६ प्रकल्पातून २ हजार ८९२ कोटी रुपयांचे कर्ज उभारले आहेत. दुसरीकडे त्यांच्याकडे फ्लॅट बुक केलेल्यांच्या कर्जाचे पैसे घेतले आहेत. पण, कोणताही प्रकल्प पूर्ण केला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते पोलिसांसमोर चौकशीला हजर झाले. पण कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही़ त्यांना कर्ज देणा-या बँक व्यवस्थापकांची भूमिकाही तपासून पाहायची आहे. त्यांनी अतिशय योजनाबद्धरितीने हा सर्व पैसा वेगवेगळ्या ठिकाणी वळविला आहे. त्यांनी ठेवीदारांकडून गोळा केलेला पैसा त्यांची पत्नी हेमती कुलकर्णी यांच्या वैयक्तिक खात्यात गेला आहे़ ३१ मार्च २०१५ रोजी त्यांनी असे पैसे फिरविले आहेत. त्यांच्या कंपनीचे आॅडिट करणा-या लेखापरिक्षकांचीही भूमिका तपासायची आहे़ त्यांनी इतक्या मोठ्या रक्कमेची काय विल्हेवाट लावली याची तपास करायचा असल्यामुळे त्यांना १० दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली.

डीएसके यांचे वकील श्रीकांत शिवदे यांनी सांगितले की, पोलीस कोठडीला विरोध करणार नाही. लोकांचे पैसे देण्यावर डीएसके अजूनही ठाम आहोत. जेवढी देणी आहेत, त्याच्या तिप्पट मालमत्ता आमची आहे. १० दिवसांची पोलीस कोठडी जास्त होते. अत; सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहोत. या युक्तीवादानंतर न्यायाधीश उत्पात यांनी डीएसके दाम्पत्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

त्यानंतर अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी वकिलांना दररोज २ तास भेटायची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ न्यायालयाचे निकालही सादर केले. त्याला अ‍ॅड़ चव्हाण यांनी आक्षेप घेतला. पोलीस कोठडी दरम्यान पुढे आलेल्या माहितीवरुन जर पोलिसांना काही कारवाई करायची असेल तर या भेटीत वकिलांपर्यंत ही माहिती जाऊ शकते. त्यातून त्या माहितीची विल्हेवाट लावली जाऊ शकते. त्यावर अ‍ॅड़ शिवदे यांनी आरोपी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. पुण्यात महिलांसाठी केवळ फरासखाना येथे एकमेव पोलीस कोठडी आहे. त्यातच वेश्याव्यवसाय करणा-या आरोपींपासून सर्व प्रकारच्या महिला आरोपींना ठेवले जाते़ त्यांना अनेक आजार आहेत़ त्यामुळे त्यांची चौकशीसाठी अशी भेट गरजेची असल्याचे सांगितले़ त्यावर न्यायालयाने पोलीस कोठडीच्या काळात दररोज सायंकाळी सात ते साडेसात वाजेपर्यंत वकिलास भेटता येईल, असा आदेश दिला.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस.कुलकर्णीPuneपुणे