शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मोटार खरेदीचे बॉम्ब फोडले, कारची तिप्पट विक्री, एकूण वाहन विक्रीत झाली ३१ टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 01:16 IST

सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर घातलेल्या निर्बंधामुळे यंदाच्या दिवाळीत फटाक्याचा बार तितकासा उडाला नाही. मात्र, पुणेकरांनी वाहन खरेदीची लडी फोडत आपली दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली आहे.

पुणे - सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर घातलेल्या निर्बंधामुळे यंदाच्या दिवाळीत फटाक्याचा बार तितकासा उडाला नाही. मात्र, पुणेकरांनी वाहन खरेदीची लडी फोडत आपली दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली आहे. त्यातही कार खरेदीचा ‘बॉम्ब’ फोडत गेल्या पेक्षा तिप्पट खरेदी केली आहे. दुचाकी आणि प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांचे देखील भुईनळे उडवत वाहन खरेदीची आतषबाजी केली आहे.वाहन विक्रीसाठी यंदाच्या दसऱ्याला तितकीशी सोनेरी झळाली लाभली नव्हती. दसºयाच्या काळात अवघ्या ५ हजार ६२६ वाहनांची विक्री झाली होती. गेल्या वर्षीपेक्षा दुचाकींची विक्री २९ टक्क्यांनी घटून, ती ४ हजार ११५ पर्यंत खाली घसरली. चारचाकी गाडींच्या विक्रीत तब्बल ५४ टक्क्यांनी घट होऊन, ती ९७० पर्यंत खाली आली. दसरा निराशाजनक गेल्याने वाहन कंपन्यांबरोबरच वाहन विक्रेत्यांना देखील दिवाळीच्या खरेदीवर वार्षिक विक्रीचे उद्दीष्ट गाठण्याचे मोठे दडपण होते. मात्र, दिवाळीमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक वाहन खरेदी करण्यात आली असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) आकडेवारीवरुन स्पष्ट होत आाहे.यंदाच्या दिवाळीला १४ हजार १८५ वाहनांची विक्री झाल्याची नोंद आरटीओकडे झाली आहे. त्यातून २५ कोटी २० लाखांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला. गेल्या वर्षीपेक्षा ८ कोटी १५ लाखांचा अधिक महसूली उत्पन्न मिळाले आहे. तसेच ३ हजार ३८५ वाहनांची अधिक विक्री झाली. दसºयात वाहन विक्रीत झालेली घट दिवाळीने भरुन काढली आहे. दुचाकी, चारचाकी, प्रवासी आणि माल वाहतूक वाहनांच्या खरेदीतही वाढ झाली आहे.दसरा आणि दिवाळी या काळातच १९ हजार ८११ वाहनांची भर पडली आहे. त्यात दोन्ही सणांच्या काळात मिळून १३ हजार ५९३ दुचाकींची विक्री झाल्याने शहरातील दुचाकींची संख्या २८ लाखांवर गेली आहे. त्यामुळे मार्च २०१९ पुर्वीच शहरातील वाहन संख्या ३८ लाखांचा टप्पा पार करेल.४सप्टेंबर २०१८ अखेरीस शहरातील वाहनांचीसंख्या ३७ लाख ६० हजार ७२५ इतकी होती. यामध्ये दुचाकींची संख्या २७ लाख ९१ हजार ८०८ आणि चारचाकी वाहनांची संख्या ६ लाख ६८ हजार ९१५ इतकी आहे. प्रवाशी आणि मालवाहतूक करणारी वाहने ३ लाख होती. 

टॅग्स :carकारbusinessव्यवसाय