शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

दिवाळीत वाहन खरेदीमध्ये मोठी वाढ, तीन दिवसांत दहा हजार वाहनांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:49 IST

पुणे : यंदाच्या दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या अवघ्या ३ दिवसांत १० हजार ४०० वाहनांची खरेदी पुणेकरांनी केली.

पुणे : यंदाच्या दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या अवघ्या ३ दिवसांत १० हजार ४०० वाहनांची खरेदी पुणेकरांनी केली. या तीन दिवसांत ८ हजार ६८५ दुचाकींची, ११४५ चारचाकी व ५७० इतर वाहनांची खरेदी पुणेकरांनी केली. त्यातून आरटीओला १७ कोटी ५ लाख रुपयांचा महसूल मिळाला़प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) वाहनांची नोंद झाल्यानंतर ते ग्राहकांना दिले जाते. दर वर्षी दसरा व दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी केली जाते. दसरा, वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा या दिवशी वाहन खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला. दि. १६ (धनत्रयोदशी), १७ (नरक चतुर्दशी) व १८ आॅक्टोबर (लक्ष्मीपूजन) या ३ दिवसांत १० हजार ४०० वाहनांची विक्री झाली. त्याचबरोबर सणांच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यांत आतापर्यंत एकूण ३६ हजार वाहने पुणेकरांनी घरी नेली आहेत. मागील वर्षी याकाळात २५ हजार वाहनांची विक्री झाली होती.आरटीओच्या आकडेवारीनुसार, दर वर्षी शहराच्या वाहनसंख्येत सरासरी दीड लाख नवीन वाहनांचीभर पडते. त्यानुसार दरमहा१० ते १२ हजार नवीन वाहनांचीनोंदणी होते. तर, दिवाळीमध्येअवघ्या ३ दिवसांत १० हजार४०० वाहने विकली गेलीआहेत. दिवाळीनिमित्त वाहन कंपन्यांनी मोठ्या सवलती जाहीर केल्या होत्या. त्याचाही लाभ ग्राहकांनी उचलला आहे.नुकतेच कॉलेजला जाऊ लागलेल्या महाविद्यालयीन युवक-युवतींना पालकांकडून दिवाळीनिमित्त दुचाकींची भेट देण्यात आली. त्याचबरोबर अनेक कुटुंबांनी यंदाच्या दिवाळीत चारचाकी खरेदी करण्याचे स्वप्नाला मूर्त स्वरूप दिले.।जीएसटीचा खरेदीवर परिणाम नाहीजुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी होती. जीएसटीमुळे वाहनांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्याचा फटका वाहन खरेदीला बसेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, लोकांनी वाढत्या किमतीची पर्वा न करता वाहन खरेदीला भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूकव्यवस्था चांगली नसल्याने दुचाकी खरेदी करणाºयांची संख्या मोठी आहेच. मात्र, त्याचबरोबर सध्या चारचाकी वाहन खरेदी करणाºयांच्या संख्येतही मोठी वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने चारचाकी वाहनांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सप्टेंबर २०१७मध्ये साडेसहा हजार, तर १ ते २३ आॅक्टोबरपर्यंत २ हजार ५०० चारचाकी वाहनांची खरेदी झाली. सप्टेंबर महिन्यात १४ हजार, तर १ ते २३ आॅक्टोबरदरम्यान ११ हजार दुचाकी विकल्या गेल्या आहेत. इतर १,६०० वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. दसरा व दिवाळीनंतर ३६ हजार नवीन वाहने नव्याने रस्त्यावर येत असल्याने त्याचा निश्चितच परिणाम रस्त्यावरच्या वाहतुकीवर होईल.।वाहनाच्या लकी नंबरलाही तुडुंब प्रतिसादआरटीओने नवीन वाहनांसाठी ग्राहकांना हवातो नंबर पैसे घेऊन देण्यास सुरुवात केल्याने त्यातून मोठा महसूल मिळू लागला आहे. लाखो रुपये खर्च करून गाडी घेतल्यानंतर त्या गाडीला आपल्याला हवा तोच नंबर घेण्यासाठी पैसे मोजण्याची तयारी ग्राहक दाखवत आहेत. या लकी नंबरसाठी ३ हजार ते ४ लाख रुपयांपर्यंत पैसे मोजले जात आहेत.

टॅग्स :diwaliदिवाळी