शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय निकालातही ‘पुणेच’, जिल्ह्याचा निकाल ९२.९९ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 05:41 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळामार्फत मार्च २०१८मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळामार्फत मार्च २०१८मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. विभागीय निकालानुसार पुणे जिल्ह्याने बाजी मारली असून, त्याचा निकाल ९२.९९ टक्के इतका लागला आहे. यानंतर अनुक्रमे सोलापूर (९२.२७ टक्के) व अहमदनगर (९०.३० टक्के) यांचा क्रमांक आहे.पुणे विभागात पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेकरिता २ लाख ६९ हजार २२० विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यांपैकी २ लाख ६८ हजार ८८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यातून २ लाख ४६ हजार ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच या परीक्षेस नोंदणी झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या १६ हजार ७७ होती. त्यांपैकी १५ हजार ९२२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार २८६ असून पुनर्परीक्षार्थींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ४६.७६ आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या निकालाची तुलना केल्यास या वर्षीदेखील मुलांंपेक्षा मुलीच वरचढ असल्याचे दिसून येते.१ लाख ४८ हजार ८७७ विद्यार्थ्यांची परीक्षेकरिता नोंदणी झाली. त्यांपैकी १ लाख ४८ हजार २३७ प्रविष्ट झाले. त्यातील १ लाख ३३ हजार ७१६ जण उत्तीर्ण झाले. विद्यार्थिनींची संख्या पाहिल्यास १ लाख १९ हजार ८५१ जणी परीक्षेकरिता प्रविष्ट झाल्या. यपिंैकी १ लाख १३ हजार १३९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.यंदाच्या उल्लेखनीय बाबीविभागनिहाय पुनर्परीक्षार्थींच्या निकालात झालेली वाढ.पुणे, अहमदनगर व सोलापूर यांपैकी सर्वाधिक पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या पुणे जिल्ह्यात.पुणे जिल्ह्यातील ९ हजार ८२७ विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ७१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.यातून ४ हजार ४१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ४५.३९ आहे.सोलापूर जिल्ह्यात उत्तीर्ण पुनर्परीक्षार्थींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सर्वाधिक आहे.३ हजार २९२ पुनर्परीक्षार्थींपैकी १ हजार ७११ उत्तीर्ण झाले.अहमदनगर जिल्ह्यात हे प्रमाण ३९.७७ टक्के एवढे आहे.मानस गाडगीळला १०० टक्केमहाराष्टÑ एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर शाळेचा विद्यार्थी मानस गाडगीळ याने दहावीमध्ये १०० टक्के गुण मिळविले. बालशिक्षण मंदिर शाळेचा निकाल गेली २६ वर्षे १०० टक्के लागत आहे. मानसला गणितात ९९, विज्ञानात ९८, सामाजिक शास्त्रांत ९७, संस्कृतमध्ये ९६ व इंग्रजीत ८८ गुण मिळाले. त्याचबरोबर टेबिल टेनिसमध्ये त्याने राष्टÑीय पातळीवरील स्पर्धांत यश मिळविल्याने त्याला २२ गुण मिळाले.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८