शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

इंदापूर शहरातील महामार्गाला दुभाजक

By admin | Updated: February 17, 2017 04:37 IST

आधीच अपुरी रुंदी असणाऱ्या शहरातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्तेदुभाजक टाकण्याचे काम युद्धपातळीवर

इंदापूर : आधीच अपुरी रुंदी असणाऱ्या शहरातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्तेदुभाजक टाकण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.ज्यांचे प्रपंच केवळ महामार्गाच्या दळणवळणावरच अवलंबून आहेत, असे फळविक्रेते, किरकोळ व्यावसायिक, वडापावविक्रेते यांचे पुनर्वसन, नित्याची वाहतूककोंडी, वाहनथांब्यांच्या प्रलंबित समस्येवर उपाय काढण्याकडे सरळ दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे आगामी काळात महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषदेला या वर्गाच्या रोषास सामोरे जावे लागेल, असे चित्र आहे.पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अकलूज नाक्याजवळ बाह्यवळण रस्ता झाला. त्यानंतर तेथून ते सरडेवाडी टोलनाक्यापर्यंतचे रस्तारुंदीकरण तीन टप्प्यांत करावयाचे ठरले. त्यानुसार अकलूज नाका ते तिरुपती पेट्रोल पंप, बाबा चौक ते इंदापूर महाविद्यालय हे दोन टप्प्यात सदोष स्वरूपात रुंदीकरण झाले. नगर परिषद निवडणुकीच्या काळापुरते हे काम अत्यंत वेगात चालू होते. नंतर त्यामध्ये ढिलाई झाली. आता या रस्त्यावर दुभाजक बसवण्याच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र, वर नमूद कळीच्या मुद्द्यांचा विसर पडला आहे.नगरपालिकेसमोरील प्रांगणाला विनाकारण कुंपण घातल्याने तिथे पार्किंग होणाऱ्या गाड्या आधीच मुख्य रस्त्यावर पार्क होऊ लागल्या आहेत. पंचायत समिती, बसस्थानक, काँग्रेस भवनच्या परिसरात हातगाडीवाले व्यवसाय करत आहेत. त्यामुळेही तेथील रस्त्याची रुंदी अधिकच कमी झाली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असताना उसाचे ट्रॅक्टर, लग्नसराईत पंचायत समितीसमोर मारुती मंदिरात येणाऱ्या लग्नाच्या वराती,काही किलोमीटर वाचवायचे अथवा अवैध प्रवाशांची ने-आण करायची यासाठी बाह्यवळण रस्ता सोडून शहरातूनच घुसणारे अवजड ट्रक. भरीत भर म्हणून बेलगाम वेगात पळणाऱ्या वाळूच्या गाड्या. ही वाहतूक जर या रस्तादुभाजक असणाऱ्या रस्त्यावरून चालणार असेल तर काय होईल, हाच प्रश्न निर्माण झाला आहे.(वार्ताहर)