शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पुन्हा राजकीय फड रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 02:55 IST

थेट जनतेतून सरंपच निवडीसाठी ही तिसरी निवडणूक होत असून यामुळे मोठी चुरस होणार आहे.

पुणे : जून ते सप्टेंबर २०१८ मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा तिसरा टप्पा जाहीर झाला असून उन्हाळी सुट्टीच्या काळात पुन्हा एकदा गावागावांत राजकीय फड रंगणार आहे. निवडणुकींचे बिगुल वाजले असून सुमारे ९० ग्रामपंचायती व २५८ ग्रामपंचायतींमधील ४५६ रिक्त पदांसाठी २७ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी आचारंहिता लागू झाली आहे. थेट जनतेतून सरंपच निवडीसाठी ही तिसरी निवडणूक होत असून यामुळे मोठी चुरस होणार आहे. काही प्रमुख ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लागल्याने अनेक मात्तबरांचे भवितव्य पणाला लागणार आहे.नुकत्याच २७ मार्च रोजी दुसºया टप्प्यातील २६ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक व ३८ गावांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. मात्र, पुणे शहरालगतच्या काही मोठ्या ग्रामपंचायतीत शिरकाव करण्यात भाजपाला यश आले होते. त्यामुळे यावेळी मोठा राजकीय आखाडा रंगला होता. त्यानंतर महिनाभरातच आता तिसºया टप्प्यातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आगामी विधानसभा व लोकसभेची चाहूलही लागली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षीय ताकद दाखविण्यासाठी राजकीय पक्ष लक्ष केंद्रीत करणार आहेत.राज्यातील ६५४ ग्रामपंचयातीचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहिर झाला. पुणे जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतीत निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी ७ ते १२ मे २०१८ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. आलेल्याअर्जांची छाननी १४ मे रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे १६ मे पर्यंत मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. मतदान २७ मे रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 या वेळेत होईल. २८ मे रोजी मतमोजणी होणार आहे.भोर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीभोर : भोर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींचा व ७१ ग्रामपंचायतींचा पोट निवडणुक होत आहे. माहे जून ते सप्टेंबर २०१८ मध्ये मुदत संपणाºया व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदासह सर्व सदस्य तसेच रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणुक कार्यक्रम जहिर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुक लागलेली गावे व सरपंच आरक्षण व निवडणुक कार्यक्रम खालील प्रमाणे ग्रामपंचायत रायरी सरपंच आरक्षण (सर्वसाधारण स्त्री), वारवंड (सर्वसाधारण), शिळींब (सर्वसाधारण), अशिंपी (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), नाटंबी (सर्वसाधारण स्त्री), करंजे (अनुसूचित जामाती स्त्री). भटक्या विमुक्त रिक्त १०९ प्रभागातील अनेक गावातील एक पासुन ५ सदस्यांपर्यत रिक्त असलेल्या १२६ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. सर्वाधीक रिक्त ७ जागा वाढाणे ग्रामपंचायतीच्या आहेत.इंदापूर तालुक्यात ५ ग्रामपंचायतीइंदापूर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पाच ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बावडा, वकीलवस्ती, काझड, शिंदेवस्ती, लाकडी या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. वरकुटे खुर्द, गिरवी, भिगवण, पिठेवाडी, थोरातवाडी रुई ग्रुप ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक