शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा तापला!

By admin | Updated: March 30, 2017 00:28 IST

यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत.

पुणे/बारामती : यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी उन्हाने जिवाची काहिली होत असून सूर्याने चाळिशीच्या आसपास मजल मारल्याचे दिसून येत आहे.उन्हामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. दुपारी बाजारपेठेतदेखील तुरळक ग्राहक दिसून येत आहेत. या वाढत्या तापमानामुळे दक्ष राहण्याच्या सूचना आरोग्यतज्ज्ञांनी दिल्या आहेत.शहर, तालुक्यात उष्णतेची लाट भडकली आहे. त्यामुळे दिवसा अघोषित संचारबंदी केल्याप्रमाणे रस्ते ओस पडत आहेत. माळेगाव येथील कृषिविज्ञान केंद्राच्या महितीनुसार शहर परिसरात बुधवारी (दि. २९) ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुथा यांनी लहान मुलांची उन्हाळ्यात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, लहान मुलांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. सकाळ, दुपारी, संध्याकाळी लहान मुलांना पाणी पाजणे महत्त्वाचे आहे. नवजात बालकांना दूध पाजणाऱ्या मातांनीदेखील पाणी भरपूर पिणे आवश्यक आहे. थंड पदार्थ लहान मुलांना देऊ नयेत. भवानीनगर येथील डॉ. संग्राम देवकाते यांनी सांगितले, की सध्या उन्हामुळे ‘डीहायड्रेशन’चा त्रास होणारे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यातच या भागात कांजिण्यांच्या रुग्णाची संख्या मोठी आहे. या रुग्यांना वाढत्या तापमानाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी बाहेरील थंड पेय घेण्यापेक्षा घरगुती लिंबू सरबत, पाणी भरपूर प्यावे. बाहेरील खाद्यपदार्थ कटाक्षाने टाळावेत, असे डॉ. देवकाते यांनी सांगितले.सोशल मीडियावरही चाळिशीसध्या सोशल मीडियावर ‘चाळिशी’ची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये चाळिशीचा खूप त्रास होत आहे. काय करावे ते कळत नाहीये. तिशीत होतो तेव्हा कसं बरं होतं, उत्साह होता. पण आता नको नकोसे झालं आहे. ४५ च्या आसपास काय होणार काय माहिती, नाही नाही, माझ्या वयाबद्दल नाही बोलत. तापमानाबद्दल बोलत आहे. ही पोस्ट सर्वत्र ‘व्हायरल’ होताना दिसते.सनबर्नचा धोका त्वचारोगतज्ज्ञ डॉ. राहुल संत यांनी सांगितले, की सध्या तीव्र उन्हामुळे ‘सनबर्न’चा त्रास झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सकाळी १०.३० ते ३.३० या वेळेत सूर्याची अतितीव्र किरणे त्वचेसाठी घातक असतात. त्यामुळे शक्य असल्यास या काळात उन्हात जाणे टाळावे. सासवड-पुरंदरला कमाल तापमान ४१ अंशांवर सासवड : सासवडसह पुरंदरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज (दि. २९) दुपारी अडीच वाजता कमाल तापमान ४१.३ अंशांवर गेले. गतवर्षी २४ मार्च रोजी तापमान ४०.२ सेल्सिअस होते. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी १ अंशाने वाढ झाल्याची माहिती आचार्य अत्रे वेधशाळेचे व्यवस्थापक नीती यादव यांनी दिली.गेले दोन-तीन दिवस उन्हाचा तडाखा वाढतच आहे. नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी आहे. सासवडमध्ये बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट जाणवत होता. घराबाहेर पडताना गॉगल, टोपी, छत्री यांचा वापर केला जात आहे. उसाचा रस, कुल्फी, आईस्क्रीम, थंड पेये घेण्याकडे कल दिसत आहे. थंड पाण्यासाठी बाजारात रांजण, माठ उपलब्ध झाले आहेत. त्यांची किंमत २५० ते १००० रुपयांपर्यंत आहे. वाढत्या उन्हामुळे लोकांना बाहेर जाणे शक्य नसले तरी मुलांच्या परीक्षा, लग्नसमारंभ, गावोगावच्या यात्रा यासाठी बाहेर पडावे लागतच आहे.