शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
4
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
5
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
6
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
7
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
8
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
9
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
10
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
11
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
12
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
13
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
14
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
15
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
16
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
17
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
18
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
19
"१७ एप्रिलला आणखी एका महिलेचा कॉल आला अन्.."; क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप
20
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

जिल्हा बँकेचे कर्जवाटपात सूडाचे राजकारण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2015 03:32 IST

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने खासगी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर केले आहे. मात्र, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची थकबाकी नसताना कर्ज नाकारले आहे.

बारामती : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने खासगी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर केले आहे. मात्र, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची थकबाकी नसताना कर्ज नाकारले आहे. कारखान्याच्या निवडणुकीतील पराभवाचे शल्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे. त्यामुळेच बँक प्रतिनिधीचा मुद्दा पुढे करून माळेगाव कारखान्याच्या हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रपंच अडचणीत आणला आहे. एफआरपीचे मुदतीत पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाला अन्य बँकांचा पर्याय शोधावा लागत आहे. ‘जिल्हा बँकेच्या माध्यमातून विरोधकांच्या ताब्यातील कारखान्याची गळचेपी... अजित पवारांचे दबावतंत्र’ असे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. जिल्हा बँकेचा प्रतिनिधी माळेगाव कारखान्यावर घेण्यासाठी दबाव आणण्यात आला. मात्र, नव्या घटना दुरुस्तीनुसार बँक आणि शासकीय प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार कारखान्यांना राहिलेला नाही, हे ज्ञात असतानादेखील अजित पवार यांनी बँक प्रतिनिधीचा हट्ट धरला आहे. जिल्ह्यातील सहकारी व खासगी ११ कारखान्यांनी कर्ज मागणी केली होती. त्यातील माळेगाव वगळता अन्य सर्व कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये खासगी कारखान्यांचादेखील समावेश आहे. खासगी कारखान्यांवर बँकेचे प्रतिनिधी नसताना कर्जमंजुरी झाली आहे त्याचबरोबर काही कारखान्यांकडे बँकेचे अगोदरचे कर्ज थकीत आहे, असे असताना त्यांना कर्ज देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. सहकारी साखर कारखानदारीला अडचणीत आणून खासगी कारखान्यांना बळ देण्याचे धोरण आखले जात आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या भूमिकेमुळे माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक मात्र आक्रमक झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक अडचणी असताना राज्य शासनाने एफआरपीचे पैसे दिल्याशिवाय नवा हंगाम सुरू करता येणार नाही. याशिवाय जे कारखाने मुदतीत एफआरपी देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सुचित केले आहे. माळेगाव कारखाना राज्यातील अग्रगण्य कारखाना आहे. मागील ५५ वर्षांपासून जिल्हा बँकेचा सभासद आहे. एफआरपीसाठी २४ कोटी आणि खेळत्या भांडवलासाठी १४ कोटी रुपये कर्जाची मागणी बँकेकडे केली होती. अन्य कारखान्यांना कर्ज देऊन तालुक्यातीलच ऊस उत्पादकांची गळचेपी राजकारणापोटी पवार यांनी केली आहे, असा सूर ऊस उत्पादकांमध्ये आहे.विशेषत: अजित पवार यांनी बँक प्रतिनिधी नियुक्त करा, अन्यथा माळेगाव कारखान्याला कर्जच देणार नाही, अशी भूमिका जाहीर कार्यक्रमात मांडली. त्यामुळे निवडणुकीतील पराभवाचे शल्य अजून असल्याचे स्पष्ट झाले. माळेगावच्या संचालक मंडळाने ‘नामधारी’ प्रतिनिधी घेण्यास अनुकूलता दाखविली. कायद्यातच बँक प्रतिनिधी घेण्याची तरतूद नाही. तसे केल्यास संचालक मंडळ बरखास्त होईल, असे बँकेलादेखील कळविले. परंतु, राजकीय हट्टापायी ऊस उत्पादकांची गळचेपी केली जात आहे. बॅँक प्रतिनिधी नेमण्यावरून झालेल्या सत्तासंघर्षात बॅँकेने माळेगावचे कर्ज नाकारले. जिल्ह्यातील ५ बॅँकांनी कर्जासाठी प्रस्ताव दिले नव्हते. तर उर्वरित १० साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये दौंड शुगर, व्यंकटेश, अनुराज शुगर या खासगी तीन कारखान्यांचा समावेश आहे. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी एफआरपीसाठी कर्ज मिळणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)