शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

‘लोकमत सरपंच अवार्ड्स’चे सोमवारी होणार थाटात वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 02:35 IST

जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता; मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सोहळा

पुणे : संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवार्ड्स’चे सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता येरवडा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच या वर्षीही ‘लोकमत सरपंच अवार्ड्स’च्या दुसऱ्या पर्वाला जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. १३ क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींनी पुरस्कारासाठी याही वर्षी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले होते. या सर्व अर्जांची ‘लोकमत’च्या पुण्यातील मुख्य कार्यालयात बुधवारी झालेल्या ज्युरी मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करण्यात आली. गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाºया व त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी झटणाºया मेहनती व कर्तबगार विजेत्या सरपंचांना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, बीकेटी टायर्स अ‍ॅग्री सेल्सचे राज्याचे प्रमुख झुबेर शेख, डिस्ट्रीब्युटर कंवरजित सिंग बंगा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.गावखेड्याच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाऱ्यांना ‘लोकमत सरपंच अवार्ड्स’ या कार्यक्रमाचे मुुख्य प्रायोजक हे बीकेटी टायर्स, तर पतंजली आयुर्वेद हे सहप्रायोजक आहेत. सलग दुसºया वर्षीही या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पुरस्कारासाठी प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.तज्ज्ञ ज्युरींनी केली अर्जांची छाननीसर्व अर्जांची तज्ज्ञ परीक्षकांकडून छाननी करण्यात आली आहे. नॅशनल फेडरेशन फॉर अर्बन बँक्स अँड के्रडिट सोसायटीचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि राज्याचे माजी कृषी आयुक्तउमाकांत दांगट या तज्ज्ञांनी सर्व अर्जांची बारकाईने पाहणी केली. काही सरपंचांशी थेट संपर्क साधून त्यांनी प्रश्नही विचारले. याद्वारे त्यांनी १३ क्षेत्रातून विविध सरपंचांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.पुरस्काराच्या कॅटेगरी आणि निकषजलव्यवस्थापन, वीजव्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरणसंवर्धन, प्रशासन /ई-प्रशासन/ लोकसहभाग, रोजगारनिर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द ईयर या १३ क्षेत्रांत हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या प्रत्येक क्षेत्रात सरपंचांनी केलेले काम पाहून, त्या-त्या क्षेत्रातील विजेते निवडले जाणार आहेत.पुरस्कार प्रदान सोहळासोमवार, दि. ११ मार्च २0१९ रोजी सायंकाळी ४.३० वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, येरवडा, गुंजन थिएटरजवळ होणार आहे. अधिक माहितीसाठी गणेश गंगाळे यांच्याशी सकाळी १० ते सायंकाळी ६.३० पर्यंत संपर्क साधावा. मो. क्र.८८८८७५८६७६

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्