महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भोर तालुक्यात जानुबाई देवस्थान ट्रस्ट आंबाडे येथे गोशाळेतील भाकड गाईंना चारा वाटप व परिसरात पर्यावरण जपले जावे या हेतूने वृक्षलागवड करण्यात आल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीपशेठ खोपडे यांनी सांगितले. या वेळी शिवसेना भोर तालुका प्रमुख युवराज जेधे, उपतालुका प्रमुख तुकाराम गोळे, समन्वयक भोर तालुका हनुमंत कंक, विभागप्रमुख शंकर जाधव, विभागप्रमुख गोविंद सावले, मारुती मोरे, चंदर वाटकर, भरत मादगुडे, रमेश तुपे, नारायण मोरे लक्ष्मण म्हस्के, संदीप चव्हाण, स्वप्निल दळवी, सागर कोंढाळकर, मुकुंद गाडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १४ भोर आंबाडे गाईंना चारा
फोटो ओळी : आंबाडे येथील जानुबाई मंदिरात गोशाळेतील भाकड गाईंना चारा वाटप करताना प्रदीप खोपडे.