शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अंतर तेच; पुणे-शिरूरला वेळ मात्र तिप्पट

By admin | Updated: December 27, 2014 22:51 IST

कंटेनर आणि लग्नकार्यासाठी मंगल कार्यालयात येणारी वाहने रस्त्यावरच पार्क केल्याने पुणे-अहमदनगर रस्त्यावर वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे.

अभिजित कोळपे ल्ल पुणे चौकाचौकांतील अतिक्रमणे, ठिकठिकाणी रस्त्यावरच उभे असलेले कंटेनर आणि लग्नकार्यासाठी मंगल कार्यालयात येणारी वाहने रस्त्यावरच पार्क केल्याने पुणे-अहमदनगर रस्त्यावर वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. पुणे ते अहमदनगर एकूण अंतर १२० किलोमीटर. पैकी पुणे ते शिरूर ६५, तर शिरूर ते अहमदनगर ५५ किलोमीटर. पुण्याहून शिरूरला पोहोचण्यासाठी अडीच तास लागतात. मात्र, शिरूरहून नगरला पोहोचण्यासाठी फक्त पाऊण तासच लागतो. त्याचे मुख्य कारण पुणे ते शिरूर रस्त्यावर बेकायदेशीरपणे केलेले अतिक्रमण आणि पार्किंग असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. ऊसवाहतूक, चंदननगरचे भाजी मार्केट आणि मोठ्या प्रमाणात गोडाऊन या रस्त्यावर असल्याने जड वाहतुकीचे प्रमाणात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. चंदननगर, खांदवेनगर, चोखी दाणी, सत्यम पार्क, वाघोली, केसनंद फाटा, मरकळ चौक, चाकण, पाबळ आणि कारेगाव या प्रमुख चौकांमध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे पुणे ते नगर या संपूर्ण रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. मात्र, शिरूरपर्यंत ६५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल अडीच तासांचा वेळ लागत आहे. मात्र, शिरूर ते नगर असा ५५ किलोमीटरच्या प्रवासासाठी फक्त पाऊण तास पुरेसा असल्याचे शुक्रवारी प्रत्ययास आले. याचे मुख्य कारण या ५५ किलोमीटरच्या मार्गावर शिस्तीत वाहतूक होत असल्याने कमी वेळ लागतो. पुणे ते शिरूर मार्गावर केवळ अतिक्रमण आणि पार्किंगच्या समस्येमुळे याउलट परिस्थिती निर्माण होत आहे. ही परिस्थिती कमी टाळण्यासाठी ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी काळजी घेण्याची नितांत गरज असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. पुणे-नगर रस्त्यावर अनेक गावांचे आठवडेबाजार भरतात. त्यामुळे भाजीविक्रेते हे रस्त्यावर विक्रीसाठी बसतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. आम्ही बऱ्याचदा बाजार समिती प्रमुखांना आणि भाजीविक्रेत्यांना आत बसण्याचे आवाहन करतो. मात्र, आम्हाला त्यांचा प्रतिसाद मिळत नाही. आमच्याकडे वाहतूक नियंत्रकांची संख्याही अपुरी आहे. त्यामुळे कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करता येत नाही. - नितीन गोकावे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखाउड्डाणपुलासाठी आमच्याकडे निधीच नाही पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली, कोरेगाव भीमा आणि शिक्रापूर येथील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आमची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबर चर्चा झाली. आम्ही त्यांना तसे निवेदन दिले आहे. मात्र निधी नसल्याने आम्ही सध्या काही करून शकत नसल्याचे पत्र आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे, असे पुणे ग्रामीणचे वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांनी सांगितले.सर्व्हिस रस्ता झाला पार्किंग रस्ता४पुणे-नगर मार्गावर फक्त चंदननगर ते वाघोली या दरम्यान सर्व्हिस रस्ता केला आहे. परंतु या रस्त्यावरच खासगी वाहने मोठ्या प्रमाणात पार्किंग करण्यास सुरुवात झाल्याने याचा वापर पूर्ण बंद झाला आहे. स्थानिक वाहतूक त्यामुळे मुख्य रस्त्यावरून सुरू झाली आहे. याचा परिणाम दिवसेंदिवस वाहतूककोंडीत भर पडत आहे. हा सर्व्हिस रस्ता तातडीने खुला करणे गरजेचे असल्याचे मत अ‍ॅड. मंदार संकपाळ यांनी व्यक्त केले. दुभाजक तोडून होतेय वाहतूक४खांदवेनगर, उबाळेनगर, सत्यम पार्क आणि चोखी दाणी परिसरात अनेक गोडाऊन असल्याने या ठिकाणी रस्त्यावरच कंटेनर उभे असतात. तसेच येथे एका कंटेनरला वळण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळात रस्त्यावर साधारण एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. अनेक वेळा येथील दुभाजक बंद केला गेला होता. मात्र, रात्रीच्या वेळी हे दुभाजक जेसीबी आणून काढून टाकले जात आहेत. असे अनेक वेळा घडल्याने कंटाळून वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड उभे केले आहेत. मात्र, पोलीस उपस्थित नसल्यास हे बॅरिकेड काढून येथून वाहने वळवली जातात. त्यामुळे येथील गोडाऊनचालकांवर कारवाईची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.