शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर तालुक्यात युती-आघाड्यांचीच चर्चा

By admin | Updated: January 31, 2017 03:56 IST

जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे ३ दिवस शिल्लक आहेत. अजून कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत.

जेजुरी : जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे ३ दिवस शिल्लक आहेत. अजून कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. उलट अजूनही तालुका पातळीवरून युती आणि आघाडीच्याच चर्चा झडत आहेत. यात पक्ष नेतेही स्वत:ला निवडणूक सोपी जावी, म्हणून एकमेकांना मदत करण्यासाठी छुप्या युतीही करण्यातच रात्रीचा दिवस करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मात्र भाजपा आणि मनसेची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागा आहेत. तालुक्यात काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, भाजपा, मनसे यांच्यात निवडणूक होणार आहे. सुरुवातीला काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसची आघाडीची जोरदार चर्चा होती. ही आघाडी झाल्यास तालुक्यातील ही निवडणूक एकतर्फी होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पुणे जिल्हा काँगे्रस अध्यक्ष संजय जगताप यांनी परवा कोणत्याही परिस्थितीत पुरंदर तालुक्यात आघाडी होणार नसल्याचे स्पष्टपणे जाहीर केल्याने सेना, मनसे, भाजपा या पक्षांच्या प्रमुखांनी उचल खाल्ली आहे. गेल्या २ दिवसांपासून पक्षनेत्यांच्या युती-आघाड्यांसाठी चर्चा सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत युतीही होणार आणि आघाड्याही होणारच आहेत. पण, त्या एक तर पक्षपातळीवरून अधिकृतरित्या होतील किंवा निवडणुकीत एकमेकाला छुपी मदत करून होतील. नाहीच उमेदवारी मिळाली, तर पक्षाचाच उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न होतील. येथपर्यंत सर्वांचेच प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आलेला आहे. तालुक्यात भाजपा वगळता इतर चारही पक्षांना स्थानिक नेतृत्व आहे. ते नेतृत्व नेमकी काय भूमिका घेणार यावरच तालुक्यातील युती -आघाडी ठरणार आहे. भाजपाला पालकमंत्री गिरीश बापटांच्याच सल्ल्याने निवडणूक लढवावी लागणार आहे. यात तालुक्यात भाजपा आणि मनसेची युती होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तालुक्यातील मनसेने भाजपाच्या संगीताराजे निंबाळकर यांना मदत केली होती. निंबाळकर या मनसेचे युवानेते बाबा जाधवराव यांच्या भगिनी असल्याने मनसे भाजपा युती शक्य असल्याने याबाबतची स्थानिक पातळीवरून बोलणीही झाल्याचे समजते. मनसेने भाजपाकडे स्वत:चा बालेकिल्ला असणारा दिवे-गराडे गट स्वत:कडे ठेवून इतर तीनही गटांत भाजपाला संधी देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. प्रत्यक्ष युतीचा निर्णय झाल्यास यात थोडाफार बदल होऊ शकतो. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (वार्ताहर)काँगे्रसचे मनोबल उंचावले : अटीतटीच्या लढतीपुरंदर तालुक्यात नुकत्याच पार पाडलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत काँगे्रसने घवघवीत यश मिळवून सासवडसह जेजुरी नगरपालिकाही ताब्यात घेतल्याने काँगे्रसची ताकद वाढलेली आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीत ही काँगे्रसने सुमारे पाऊण लाख मते मिळवलेली होती. आता पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक म्हणजेच मिनी विधानसभेचीच ही निवडणूक होऊ घातलेली आहे. यामुळे सर्वच पक्षनेत्यांची आसने डळमळीत झालेली आहेत. स्वत:चे बालेकिल्ले तरी राखण्यासाठी व काँगे्रसला रोखण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी अशा युती आणि आघाड्याही होणार आहेत.