शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेत अडकला मेट्रो प्रकल्प

By admin | Updated: December 27, 2014 05:06 IST

तथाकथित मेट्रो प्रकल्प नव्या केंद्र व राज्य शासनाच्या चर्चे$च्या फेऱ्यांमध्येच अद्यापही असल्याचे शुक्रवारी दिसून आले.

पुणे : तथाकथित मेट्रो प्रकल्प नव्या केंद्र व राज्य शासनाच्या चर्चे$च्या फेऱ्यांमध्येच अद्यापही असल्याचे शुक्रवारी दिसून आले. खासदार अनिल शिरोळे यांनी ही रेल्वे भुयारी की जमिनीवरून होणार, जुन्या डी.पी.आर.मध्ये (सविस्तर प्रकल्प अहवाल) कोणत्या चुका आहेत, याबाबत संदिग्ध उत्तरे दिली आणि स्वस्त व चांगली मेट्रो पुणेकरांना देऊ असेही सांगितले. संसदेत पुण्यातील प्रश्नांविषयी उपस्थित केलेल्या बाबींची माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली. आमदार मेधा कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. शिरोळे म्हणाले, ‘‘मेट्रो प्रकल्पाचा अहवाल सदोष असून, मध्य पुण्यात तसेच भुयारी मार्ग करण्याच्या खर्चात गेल्या काही वर्षांत झालेली लक्षणीय घट विचारात घेतलेली नाही. पुणेकरांसाठी गैरसोयीची रचना अंगीकारली गेली आहे. या बाबींचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.’’यूपीए सरकारने फेब्रुवारीमध्ये पाठविलेल्या पत्रातील महत्त्वाच्या मुद्दांचाही विचार झालेला नाही, ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी बारकाईने या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याशिवाय मंजूर करणार नसल्याचे सांगितले आहे, असेही शिरोळे यांनी सांगितले.जुन्या डी.पी.आर.मध्ये काय दोष आहेत असे विचारले असता, शिरोळे यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. प्रकल्प आजवर केवळ चर्चेत आहे, तो कधी पूर्ण होणार, असे विचारले असता शिरोळे यांनी आगामी वर्षात सुरू करू, असे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री गिरीश बापट यांनी जुन्या डी.पी.आर.नुसार मेट्रो होईल, असे सांगितल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर या चर्चा केवळ वर्तमानपत्रांतून होत आहेत, असा दावा शिरोळे यांनी केला. मेट्रो भुयारी मार्गातून की रस्त्यावरून याबाबत योग्य निर्णय होईल, असे शिरोळे यांनी सांगितले.आमदार कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘दोन दिवसांपूर्वी पुण्यातील प्रश्नांविषयी बापट यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. या प्रकल्पावर चर्चा झाल्याशिवाय चुकीचे काही होऊ देणार नाही. एखादा महिना उशीर झाला तर तो पुणेकरांच्या हिताचाच असेल.’’(प्रतिनिधी)