शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 04:03 IST

माहिती अधिकाराअंतर्गत गेल्या तीन वर्षांत आठ प्रकरणांमध्ये प्रथम अपिलात सुनावण्या न घेतल्याबद्दल तसेच खंडपीठापुढे हजर न झाल्याने आणि लेखी स्वरूपात खुलासा

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : माहिती अधिकाराअंतर्गत गेल्या तीन वर्षांत आठ प्रकरणांमध्ये प्रथम अपिलात सुनावण्या न घेतल्याबद्दल तसेच खंडपीठापुढे हजर न झाल्याने आणि लेखी स्वरूपात खुलासा न दिल्याने इंदापूरचे तहसीलदार संजय पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी शिफारस पुणे खंडपीठाचे माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांनी राज्याच्या महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहेत. माहिती अधिकार अधिनियम आणि राज्य शासनाच्या परिपत्रकांचे उल्लंघन केल्यामुळे ही कार्यवाही करण्यात आली आहे.इंदापूरचे तत्कालीन तहसीलदार संजय पवार यांच्याकडे आठ अर्जदारांनी विविध स्वरुपाची माहिती अधिकारामध्ये मागितली होती. परंतु, अर्जदारांनी मागितलेली माहिती पवार यांनी दिली नाही. तसेच माहिती न दिल्याने प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून पवार यांनी सुनावणी घेऊन व दोन्ही पक्षाची बाजू ऐकून आदेश करणे आवश्यक होते. परंतु, आठही प्रकरणांमध्ये त्यांनी गेल्या तीन वर्षांत एकदाही सुनावणी घेतली नाही. परिणामी अर्जदारांकडून पुणे खंडपीठाच्या माहिती आयुक्तांकडे दुसरे अपील करण्यात आले. त्यामुळे माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांनी संजय पवार यांना समक्ष हजर राहून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. माहिती आयुक्तांच्या आदेशानंतरही पवार यांनी खुलासा सादर केला नाही. परिणामी माहिती आयुक्तांनी अंतिम सुनावणीमध्ये तहसीलदारांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस केली आहे. - माहिती अधिकार अधिनियमातील १९ (६) आणि राज्य सरकारच्या २००७ आणि २००८ मध्ये प्रसिद्ध परिपत्रकांचे उल्लंघन केल्याबद्दल तहसीलदार संजय पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. राज्याच्या महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे तहसीलदारांवर माहिती आयुक्तांकडून शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करणे ही राज्यातील पहिली घटना ठरली आहे. इंदापूरचे तत्कालीन तहसीलदार संजय पवार सध्या करमाळा तालुक्याच्या तहसीलदार पदी कार्यरत आहेत.