शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 23:52 IST

घटना घडल्यानंतर पावणेअकरा वाजता त्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख गणेश सोनुने यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून समजली.

राजू इनामदार 

पुणे : आपत्तीच्या काळात कसोटी लागणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा शहराला फारसा उपयोग नाही, हेच गुरुवारी झालेल्या कालवाफुटीने सिद्ध केले. गर्दीपासून मदतीपर्यंत कशाचेही व्यवस्थापन या काळात पुरेशा प्रभावीपणे झालेले नाही, असाच या काळात तिथे काम करणाºया स्थानिक कार्यकर्त्यांचा अनुभव आहे.

घटना घडल्यानंतर पावणेअकरा वाजता त्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख गणेश सोनुने यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून समजली. त्यांनी त्याबाबत तहसील कार्यालयाला कळवले. त्यानंतरचे आपत्ती व्यवस्थापनाचे काम सर्व यंत्रणांना जागे करण्याचे, त्यांच्याशी समन्वय ठेवण्याचे, ते घटनास्थळी गेले आहेत किंवा नाही हे पाहण्याचे, त्यांचे काम सुरू झाले आहे की नाही ते तपासण्याचे आहे असे सोनुने यांचे म्हणणे आहे. त्याप्रमाणे आपण अग्निशमन विभाग, वाहतूक शाखा, पोलिस, वीज वितरण मंडळ, आरोग्य विभाग, महापालिकेची त्या विभागातील क्षेत्रीय कार्यालये, त्यांचे प्रमुख अधिकारी यांना कळवले असे त्यांनी सांगितले. त्यानंतर या सर्व यंत्रणांनी घटनास्थळी त्वरीत उपस्थित राहणे, व कामाला सुरूवात करणे गरजेचे होते.प्रत्यक्षात तसे झाले नाही असे घटनास्थळी गेलेले स्थानिक नगरसेवक धीरज घाटे यांनी ठामपणे सांगितले. काहीवेळाने तिथे शिवदर्शन मधील नगरसेवक आबा बागूल त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत आले. शंकर पवार, आनंद रिठे हे स्थानिक नगरसेवकही तिथे आले. त्यानंतर पोलिस व अग्निशमन दलाची वाहने तसेच मनुष्यबळ तिथे आले. मात्र त्यांच्या कामात नियोजन नव्हते. पोलिसांचे काम बघ्यांची गर्दी नियंत्रीत करण्याचे, मात्र त्यांच्यातील काही पोलिस पाणी घुसले त्या वसाहतींमध्ये जाऊन तिथे अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. वाहतूक शाखेने वाहतूक नियंत्रण करणे गरजेचे असताना ते गर्दी नियंत्रीत करत होते. तर अग्निशमन दलाच्या जवानांना पाण्याचा लोंढा इतका जोराचा येत होता की बराच वेळ काय करायचे तेच सुचत नव्हते. यंत्रणा उपस्थित झाल्या, मात्र सगळेच मदतकार्याला गुंतले. थोड्याच वेळात तिथे मदतीला जाणारे व मदतीची गरज असणारे एकत्रच होऊन गेले. पुराच्या काळात आवश्यक असणारी लाईफ जॅकेटस् वगैरे आणलेलीच नव्हती. त्यामुळे जवानांनी वाहनात असलेले दोरखंड वापरून मदत कार्य सुरू केले. त्याचीही गर्दी झाली. बघे त्यात घूसू लागले. त्यामुळे जे मदत करत होते त्यांना ती नीट करताही येईना. दरम्यानच्या काळात पाटबंधारे विभागाबरोबर संपर्क साधून कालव्यात पाणी सोडणे बंद करणे गरजेचे होते. पाण्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर सुरूच होता असे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Puneपुणे