शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

अपंग कल्याण आयुक्तालय, नको रे बाबा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 02:06 IST

अपंग कल्याण आयुक्तालय स्थापन झाल्यापासून गेल्या अठरा वर्षांत केवळ दोन अधिकाऱ्यांनी आयुक्तपदाचा कार्यकाळ पूर्ण केला असून इतर दहा अधिका-यांनी सुमारे एक ते दीड वर्षातच बदली करून घेतली आहे.

- राहुल शिंदेपुणे : अपंग कल्याण आयुक्तालय स्थापन झाल्यापासून गेल्या अठरा वर्षांत केवळ दोन अधिकाऱ्यांनी आयुक्तपदाचा कार्यकाळ पूर्ण केला असून इतर दहा अधिका-यांनी सुमारे एक ते दीड वर्षातच बदली करून घेतली आहे. अपंग कल्याण आयुक्तालयाकडे अधिकाºयांकडून दुय्यम स्वरूपाचे काम म्हणून पाहिले जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यामुळे राज्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यास कोणीही वाली नाही, अशी भावना दिव्यांगांकडून व्यक्त केली जात आहे.राज्यात सुमारे २९ लाख दिव्यांग असून त्यांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करून देणे, राज्य व केंद्र शासनाकडून दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाºया योजनांची योग्य अंमलबजावणी करणे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी कार्यालये आदी ठिकाणी दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविणे आदी कामे अपंग कल्याण आयुक्त कार्यालयातर्फे करणे आवश्यक आहे. मात्र, अपंग कल्याण आयुक्त कार्यालय स्थापन झाल्यापासून केवळ दोन अधिकाºयांचा अपवाद वगळता बहुतांश अधिकाºयांनी केवळ एक ते दीड वर्षच या पदावर काम केले आहे. तर काही अधिकाºयांनी दोन ते आठ महिनेच आयुक्तपदी काम पाहिले आहे.दिव्यांग व्यक्तींच्या अडचणी सोडविण्यासाठी आयुक्तांनी व आयुक्त कार्यालयातील कर्मचाºयांनी काम करणे अपेक्षित आहे. मात्र, कार्यालयात अपुरे मनुष्यबळ आहे. आयुक्तांना न्यायालयाचा दर्जा असून त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे सर्व संस्था व अधिकाºयांना बंधनकारक आहे. मात्र, अनेक अधिकारी या पदावर काम करण्यास उदासीन असल्याचे दिसून येते. आजही दिव्यांगांना पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने सार्वजनिक जीवनात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाने या पदावर पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी अपंग हक्क सुरक्षा समितीकडून करण्यात आली आहे.अपंग आयुक्तालय स्थापन झाल्यापासून अपवादात्मक परिस्थितीत आयुक्तांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यामुळे सध्या राज्यात दिव्यांगांच्या सुविधांची परिस्थिती दयनीय आहे. आयुक्तालयाला स्वायत्त दर्जा नसून या कार्यालयात कर्मचारी संख्यासुद्धा कमी आहे. त्यामुळे दिव्यांगांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.- हरिदास शिंदे, अध्यक्ष, अपंग हक्क सुरक्षा समिती>अपंग कल्याण आयुक्तपदी काम केलेल्या अधिकाºयांचा कार्यकालअधिकाºयाचे नाव पद स्वीकारले पद सोडलेसी. ए. पाठक २४/१०/२००० २/१०/२००२सोनिया सेटी ३/१०/२००२ ७/११/२००२डॉ. संजय चहांदे ८/११/२००२ १९/४/२००३डॉ. के. एच. गिविंदराज २०/४/२००३ ३०/६/२००४आर. के. गायकवाड ८/८/२००४ ११/१/२००८नितीन गद्रे ११/१/२००८ १०/१०/२००८एम. एच. सावंत ७/२/२००९ ५/१०/२०१०बाजीराव जाधव ५/१०/२०१० २८/२/२०१४ज्ञा. स. राजुरकर २८/२/२०१४ ६/८/२०१४नरेंद्र पोयाम २६/८/२०१४ २२/५/२०१६नितीन पाटील १६/६/२०१६ १३/४/२०१८रुचेश जयवंशी १९/४/२०१८ १४/११/२०१८