शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:20 IST

खेड- शिवापूर : चार महिन्यांपूर्वी केलेला रस्ता पुन्हा उखडला

खेड शिवापूर : कोंढणपूर फाटा (पुणे-सातारा महामार्ग) ते तीर्थ कोंढणपूर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे काम घटस्थापनेपूर्वी करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांसह भाविकांकडून केली जात आहे. कोंढणपूर फाटा ते कोंढणपूर दरम्यानच्या रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने दुरुस्त केले होते. चार महिन्यां पूर्वी केलेले काम पूर्णत: उखडले आहे. येत्या दहा दिवसांनी दसरा तोंडावर आला आहे. या दहा दिवसांदरम्यान राज्यातून तसेच परराज्यातून, स्थानिकांसह अनेक भाविक श्री क्षेत्र कोंढणपूर (ता. हवेली) येथील तुकाईमाता मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या भाविकांना या रस्त्याचा प्रचंड त्रास होणार आहे.

तसेच याच मार्गाने खेड शिवापूर परिसरातील ज्येष्ठ नागरिक पहाटे पाच ते सात किमी व्यायामासाठी चालत जातात. यामुळे या ज्येष्ठ नागरिकांनी हा रस्ता घटस्थापनेपूर्वी दुरुस्त करून घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. खड्ड्यांबरोबरच परिसरात गटारीची व्यवस्था केली नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहात आहे. यामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला पांढरे पट्टे मारण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. याबाबत बांधकाम अधिकाऱ्यांना विचारले असता संबंधीतांना नोटीस दिली असल्याचे त्यांनी सांगितले.परंतु चार महिन्यांपूर्वीचकेलेला रस्ता पुन्हा उखडला कसा? या प्रश्नाचे उत्तर खुद्द संबंधित प्रशासनाकडूनही मिळत नाही.खेड शिवापूर परिसरात ठेकेदारांनी दुरुस्त केलेल्या रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली आहे आणि प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.महामार्ग (कोंढणपूर फाटा) ते तीर्थ क्षेत्र कोंढणपूर दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अत्यंत दुरवस्था झाली आहे.

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा